7 May 2024 3:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

कर्नाटकात भाजप पराभवाच्या दिशेने सुसाट! लिंगायत समाजाचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार काँग्रेसच्या वाटेवर

Former CM of Karnataka Jagdish Shettar

Jagadish Shettar to Join Congress | कर्नाटकातील लिंगायत समाजाचे मोठे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांनी १० मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारकीचा राजीनामा दिला असून काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा की नाही, याचा निर्णय अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेला नाही. यावेळी त्यांना तिकीट दिले जाणार नाही, असे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने स्पष्ट केल्यानंतर शेट्टर यांनी राजीनामा दिला. हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघाचे आमदार शेट्टर यांनी उत्तर कन्नड जिल्ह्यातील सिरसी येथे जाऊन विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का, असे विचारले असता कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री म्हणाले, ‘मी अद्याप निर्णय घेतलेला नाही.

कर्नाटक भाजपचे काही नेते राज्यात पक्षाला चुकीच्या पद्धतीने हाताळत आहेत, असा आरोप शेट्टर यांनी रविवारी केला होता. मी आमदारकीचा राजीनामा देणार असून पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा देणार आहे. त्यानंतर मी माझे पुढचे पाऊल ठरवेन की मला स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची की पक्षासोबत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत झालेल्या गैरवर्तनाने आणि अपमानाने मला खूप दुखावले आहे. भाजपचा राजीनामा देण्याचा माझा निर्णय अंतिम आहे. राज्यातील काही नेते कर्नाटकातील भाजप व्यवस्थेचा गैरवापर करत आहेत.

कर्नाटकचे भाजपचे निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी शेट्टर यांची समजूत काढण्याचे अनेक प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही. हुबळी-धारवाडचे आमदार असलेले जगदीश शेट्टर हे लिंगायत समाजाचे मोठे नेते मानले जातात. त्यांनी मुख्यमंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडली आहे. याशिवाय तब्बल 6 वेळा आमदार राहिले आहेत.

काँग्रेसच्या संपर्कात :
दरम्यान, शेट्टर यांच्यासाठी काँग्रेसने पायघड्या टाकल्याच दिसून आलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बीके हरिप्रसाद म्हणाले की, शेट्टर यांना काँग्रेसमध्ये जायचे असेल तर त्यांचा पक्ष त्यांचे स्वागत करेल. ‘प्रामाणिक मुख्यमंत्री’ असं शेट्टर यांचं वर्णन करत हरिप्रसाद म्हणाले की, त्यांच्या कार्यकाळात त्यांच्यावर कोणतेही आरोप नव्हते. दुसरीकडे, एम.बी.पाटील, सिद्धरामय्या, डीके शामनूर हे तीन बडे नेते शेट्टर यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. त्यांना बंगळुरूहून आणण्यासाठी विशेष विमानही सज्ज ठेवण्यात आले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Former CM of Karnataka Jagdish Shettar left the BJP to join congress party check details on 16 April 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x