26 May 2022 7:14 PM
अँप डाउनलोड

राज्यात ५००० जण करोनाबाधितांच्या जवळून संपर्कात होते: आरोग्यमंत्री राजेश टोपे

Corona Crisis, Covid19, Rajesh Tope

मुंबई, १ एप्रिल : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यादरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक धक्कादायक माहिती दिली आहे. पुढील काही दिवसात मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढण्याची भीती आरोग्यमंत्र्यांनी वर्तवली आहे. सध्या मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या १६२ वर पोहोचली असून ५००० पेक्षा अधिक जण हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. या सर्वांना विलगीकरणात ठेऊन चाचणी केली जाणार आहे. सध्या सर्वांवर लक्ष ठेवलं जात आहे. चार हजार लोक या सर्वांवर लक्ष ठेवून आहेत” असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्यात आता संशयितांची चाचणी वेगाने करण्याचं आव्हान रुग्णालयांसमोर आहे. मुंबईत ५ सरकारी आणि ७ खाजगी रुग्णालयांमध्ये चाचणी केली जात आहे. एका दिवसाला दोन हजार चाचण्या केल्या जाण्याची क्षमता सध्या मुंबईत आहे. याशिवाय अतिरिक्त मास्क आणि व्हेंटिलेटर्सचीही तयारी केली जात आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

तसेच मुंबईतील करोनाग्रस्तांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुंबईतील करोनाबाधितांची संख्या १६२ वर पोहोचली असून पाच हजारांपेक्षा अधिक जण हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. राजेश टोपे यांनी आज मुंबई महापालिकेच्या वॉर रुमला भेट दिली. यावेळी त्यांनी तेथे बैठक घेतली. या बैठकीनंतर बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

 

News English Summary: For the last two days, the number of corona patients in Mumbai has been increasing rapidly. Meanwhile, Health Minister Rajesh Tope has given a shocking information. The health minister has warned of increasing the number of coroners in Mumbai in the next few days. At present, the number of coronary arteries in Mumbai has reached 162 and more than 5000 are in high risk contact, Rajesh Tope said. All of them will be tested in isolation. Currently everyone is being monitored. Four thousand people are keeping an eye on it all, “he also explains. Hospitals now face the challenge of speeding up the testing of suspects in the state. Tests are being conducted in 5 government and 7 private hospitals in Mumbai. Mumbai currently has the capacity to perform two thousand tests a day. Besides, additional masks and ventilators are also being prepared, Rajesh Tope said.

 

News English Title: Story over 5000 people in Maharashtra quarantined as they were in close contact with 162 Covid 19 patients in state says State Health minister Rajesh Tope News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x