14 December 2024 9:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

भारिप-बहुजन आणि एमआयएम युती भाजपच्या मदतीसाठी आखलेला डाव : सामना

मुंबई : भारिप-बहुजन आणि एमआयएम युती भाजपच्या मदतीसाठी आखलेला डाव असल्याची टीका सामना मुखपत्रातून करण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी हे आगामी निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. मुस्लिम आणि बहुजन ऐक्याची हाक देत आम्ही आमची आगामी निवडणुकीत दाखवून देऊ अशी घोषणा उभयतांकडून करण्यात आली आहे.

वास्तविक हे दोन्ही पक्ष कालपर्यंत भाजपच्या सोयीचे राजकारण करत आले आहेत. मात्र २०१९ मधील निवडणुकीत हे भाजपाला उघड मदत करतील. नेमकी त्यासाठीच आंबेडकर आणि ओवेसी यांनी अभद्र युती केली आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भारिप-बहुजन महासंघ आणि एमआयएम युतीवर सडकून टीका केली आहे.

काही दिवसांपूर्वीच भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्याची घोषणा केली आहे. त्याअनुषंगाने येत्या २ ऑक्टोबर रोजी औरंगाबाद येथे या युतीची भव्य सभा सुद्धा आयोजित करण्यात आली आहे. ‘दलितांनी दलित म्हणूनच डबक्यात राहावे व मुस्लिमांनी देशाचे नागरिक म्हणून नव्हे, तर केवळ मुस्लिम म्हणूनच जगावे यासाठी जाणीवपूर्वक डबकी तयार केली जातात. प्रकाश आंबेडकर व ओवेसींनी एकत्र येऊन भाजपला पूरक असे नवे डबके तयार केले आहे. मात्र दलित व मुसलमानांनी वेळीच एकत्र येऊन ही डबकी उधळून लावायला हवी. दरम्यान, २०१९च्या निवडणुकीत कुणाला ‘चारायचे’ व कुणाला ‘पाडायचे’ यासाठी ठरवून टाकलेला हा डाव आहे’, असा थेट आरोप सुद्धा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या नव्याने जन्माला आलेल्या युतीवर केला आहे.

काय म्हटलं आहे उद्धव ठाकरे यांनी सामना मुखपत्रात…

१. त्या दोघांचे एकत्र येणे हे भारताच्या राजकारणासाठी शुभसंकेत नाहीत. आंबेडकर व ओवेसी यांनी उघडपणे भारतीय जनता पक्षाबरोबर जायला हवे होते, पण ‘वंचित बहुजन आघाडी’च्या नावाखाली आंबेडकर-ओवेसी यांनी नवा तंबू टाकला आहे.

२. एमआयएम हा मुस्लिम लीगचा भ्रष्ट अवतार आहे व मुसलमानांच्या व्होट बँकेचे राजकारण करून देशात फुटीची बीजे रोवण्याचे त्यांचे काम सुरू आहे. ‘‘पंचवीस कोटी मुसलमान हिंदूंना भारी पडतील. पोलिसांना दूर ठेवा, आम्ही हिंदूंच्या कत्तली करू’’ अशी कसाईछाप भाषा वापरणार्‍या ओवेसीशी हातमिळवणी करून प्रकाश आंबेडकरांनी दलित समाजाला नव्या खड्ड्यात ढकलले आहे.

३. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या समाज बांधवांसाठी अमृताचा प्याला दिला. त्यात विष कालवण्याचे काम करू नका. अर्थात कोणी कितीही मांडीवर थापा मारल्या तरी दलित समाज व राष्ट्रवादी मुसलमान हा शहाणाच आहे. नव्या अभद्र युतीकडे तो वळणार नाही. महाराष्ट्रातील दलित संघटना या सत्ताधार्‍यांच्या दावणीला कायम बांधलेल्या असतात व समाजापेक्षा स्वतःचेच हित ते पाहत असतात. कोणत्याही रिपब्लिकन नेत्याला जनाधार नाही व अस्मिता नाही. जातीधर्माच्या नावाने त्यांचे चांगभले सुरूच असते. प्रकाश आंबेडकर ओवेसीच्या तंबूत गेले त्यातून त्यांचाच खरा चेहरा उघड झाला.

४. ओवेसीची भाषा अस्थिरता आणि अराजक निर्माण करणारी असते. ती प्रकाश आंबेडकरांना मान्य आहे काय? त्यांना दलितांचे न्याय्य हक्क हवे आहेत, पण म्हणजे नक्की काय हवे आहे? दलितांची माथी भडकवायची. त्यांच्या मनात अशांततेचे विचार टाकायचे व राज्यात दंगलींचा धूर काढायचा, असा ओवेसीबरोबरच्या आघाडीचा अर्थ उद्या कोणी काढला तर त्याचे काय उत्तर प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आहे? पुन्हा रोटी, कपडा व मकान यासाठी त्यांच्या आघाडीकडे काय कार्यक्रम आहे? बेरोजगारीवर कोणता उतारा आहे? दलित वस्त्यांतील राजकारण भडकत ठेवायचे व आपापसात दुही माजवायची हे सर्व दलित संघटनांचे आजवरचे धोरण राहिले आहे.

हॅशटॅग्स

#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x