18 May 2022 11:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

मराठा आरक्षणावरून निलेश राणेंचा प्रकाश आंबेडकरांना दम ? सविस्तर

पुणे : नारायण राणेंनी मराठा आरक्षणाचा बट्ट्याबोळ केल्याची टीका केल्याने माजी खासदार निलेश राणे हे प्रकाश आंबेडकरांवर चांगलेच संतापले आहेत. निलेश राणेंनी प्रकाश आंबेडकरांना थेट आवाहन देत, ‘राणेसाहेबांबरोबर समोरासमोर चर्चा करण्याचा दम आहे कां? असा प्रश्न विचारला आहे.

भारिप बहुजन महासंघाचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी खासदार नारायण राणे यांच्यावर मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून टीका केली होती. नारायण राणेंनी मराठा आरक्षणाचा बट्ट्याबोळ केला अशी टीका ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केली होती.

ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या या टीकेलाच माजी खासदार निलेश राणे यांनी थेट उत्तर दिल आहे. निलेश राणेंनी प्रकाश आंबेडकरांना थेट आवाहन देत, ‘राणेसाहेबांबरोबर समोरासमोर चर्चा करण्याचा दम आहे कां? असा ट्विट करत थेट आवाहन दिलं आहे. पुढे निलेश राणे कोपर्डी घटनेचा उल्लेख करत म्हणाले की, प्रकाश आंबेडकर कोपर्डीच्या घटने वेळी गप गार-गार होते आणि अचानक कोरेगाव-भीमा वेळी जीवंत झाले. गप घरी बसून आंदोलन करणारे प्रकाश आंबेडकर संभाजी भिडेंना एक दिवस सुद्धा तुरुंगात टाकू शकले नाहीत, असेही निलेश राणे प्रकाश आंबेडकरांना उत्तर दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले आहेत निलेश राणे प्रकाश आंबेडकरांना ट्विट करत ?

हॅशटॅग्स

#Narayan Rane(140)#Prakash Ambedkar(117)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x