3 December 2024 8:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | आता प्रत्येक महिला व्याजाने कमवेल 30000; जाणून घ्या पोस्टाच्या योजनेची फायद्याची गोष्ट - Marathi News Mutual Fund SIP | पैशाचे पैसा वाढवा, बचत फक्त 167 रुपये, पण परतावा मिळेल 5 कोटी रुपये, जाणून घ्या अनोखा फंडा - Marathi News Waaree Renewables Share Price | 49,968% परतावा देणारा शेअर रॉकेट होणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - SGX Nifty Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - SGX Nifty Vedanta Share Price | वेंदाता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, संधी सोडू नका - SGX Nifty Ola electric | ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत 30 टक्क्यांची मोठी घट; नेमकं कारण काय जाणून घ्या - Marathi News Home Loan | गृहकर्जावर बँक वसूलते एकूण 6 प्रकारचे चार्जेस; पहिल्यांदाच लोन घेणाऱ्यांना हे माहित असणे गरजेचे आहे
x

BJP Chitra Wagh | महाराष्ट्रात खूप विषय प्रश्न आहेत, संजय राठोड प्रकरण आता संपवूया, चित्रा वाघ यांचा युटूर्न?

BJP Chitra Wagh

BJP Chitra Wagh | दोन दिवसांपूर्वी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून राजकारण चांगलंच तापलं. या प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी माफी मागितली. आता या वादात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी नाव न घेता सुप्रिया सुळे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. सिलेक्टिव महिलांचा अपमान हा संपूर्ण राज्यातील महिलांचा अपमान होत नाही. महविकास आघाडीच्या काळात कंगना राणावत, सप्ना पाटकर, नवनीत राणा यांचाही अपमान करण्यात आला होता, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे, महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेना आमदार संजय राठोड यांच्यावर कठोर भाषेत दोषारोप करणाऱ्या चित्रा वाघ यांनी याप्रकरणी पूर्णपणे राजकीय पलटी मारल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय. पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येसाठी यवतमाळचे आमदार संजय राठोड दोषी असल्याचा ठपका भाजप तसेच महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ठेवला होता. मात्र आता शिंदे आणि भाजपचं सरकार आल्यावर चित्रा वाघ यांनी ही भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे एखाद्या गंभीर महिला विषयक प्रकरणात विषय भाजपाला पोषक आहे की मारक यावरून त्या भूमिका ठरवतात असा आरोप विरोधकांनी अनेकदा केला आहे. त्याचाच प्रत्यय आज आल्याचं म्हटलं जातंय.

चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्या
अमरावतीत दौऱ्या दरम्यान प्रसार माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, ‘संजय राठोड प्रकरण आता संपवूया. त्याशिवाय महाराष्ट्रात खूप विषय प्रश्न आहेत. संजय राठोड यांच्या विरोधात लढा सुरूच राहील पण तो न्यायालयात. तेथे माझा लढा सुरू राहील. संजय राठोड यांना महाविकास आघाडी सरकारनेच क्लीन चिट दिली आहे, त्यामुळे काही प्रश्न तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही विचारा असा सल्ला चित्रा वाघ यांनी दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: BJP Chitra Wagh statement on minister Sanjay Rathod check details 10 November 2022.

हॅशटॅग्स

#BJP Chitra Wagh(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x