28 May 2020 5:17 PM
अँप डाउनलोड

धारावीत कोरोनाचा चौथा रुग्ण, मुंबईसाठी धोक्याची घंटा

Corona Crisis, Covid 19, Dharavi Slums

मुंबई, ४ एप्रिल: कोरोना व्हायरसनं महाराष्ट्रात थैमान घातलं आहे. त्यातही सर्वात जास्त धोका मुंबईला निर्माण झाला आहे. असं असतानाही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध असलेल्या धारावीमध्ये आतापर्यंत तीन कोरोना पॉझिटिव्ह केसेस सापडल्या आहेत. त्यापैकी पहिल्या रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्याचं थेट कनेक्शन दिल्लीत निजामुद्दीन इथे पार पडलेल्या तबलिगी जमासोबत असल्याचं समोर येत आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

निजामुद्दीन मरकजमध्ये उपस्थित असलेल्यांपैकी १० लोकांपैकी ६ जण मुंबईतील धारावी परिसरात राहात होते. त्यापैकी चार लोक सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये वेगवेगळ्या भागांत ४ जण राहात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यापैकी २ लोकांचा पोलीस प्रशासनाकडून शोध सुरू आहे. अद्यापही हे दोन जण सापडू शकले नाहीत. त्यामुळे मुंबईचा धोका वाढला आहे.

तबलिगी जमातचे हे ५ जण नंतर केरळला गेले. परंतु त्यांच्या संपर्कात आलेल्या डॉ बालिगा नगरच्या ५९ वर्षीय व्यक्तीचा कोरोनानं दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे. आता याच बालिगानगरधील ३० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्यानं मरकज कनेक्शन घट्ट होत असून मुंबईसाठी ही धोक्याची घंटा आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ५०० च्या वर पोहोचली आहे. आज कोरोनाचे आणखी २७ रुग्ण आढळून आले आहेत. मुंबई हे कोरोनासाठी हॉटस्पॉट बनलं आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे मुंबईत आढळून आले आहेत. आता आणखी रुग्ण वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान मरकज सारखे कोणतेही कार्यक्रम महाराष्ट्रात करोनाचं संकट टळेपर्यंत होणार नाहीत असं आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. मरकज सारखा कार्यक्रम महाराष्ट्रात होणार होता त्याला परवानगीही मिळाली होती मात्र करोनाचं संकट लक्षात घेऊन ती रद्द करण्यात आली असंही त्यांनी सांगितलं. त्यांनी आज फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.

 

News English Summary: Corona Virus has been established in Maharashtra. Mumbai is also facing the highest risk. Nevertheless, three Corona-positive cases have been found in Dharavi, now known as Asia’s largest slum. The first of these patients died of coronas. His direct connection with the Talbigi Jamaat in Nizamuddin in Delhi appears to have come up. Of the 10 people who attended Nizamuddin Merkaj, six were from Mumbai’s Dharavi area. It is shocking to know that four of the four people live in different parts of Dharavi, the largest slum. Two of them are under investigation by the police administration. The two were still unable to be found. This has increased the risk of Mumbai.

 

News English Title: Story 4th corona patient found in Mumbai Dharavi Covid 19 News Latest Updates.

महत्वाची सूचना: आपण सरकारी नोकरीचा सराव महाराष्ट्रनामा न्यूज'वर ऑनलाईन करू शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि सुरु करा सरकारी नोकरीचा ऑनलाईन अभ्यास ऑनलाईन

https://www.maharashtranama.com/online-test/

IMPORTANT TOPICS - MPSC EXAM | MPSC Study | MPSC Online Study | UPSC EXAM | UPSC Study | Police Recruitment | Police Bharti | Mumbai Police Recruitment | Mumbai Police Bharti | Maharashtra Police Bharti | Maharashtra Police Recruitment | Police Exam Study | Talathi Bharti | Talathi Recruitment | Talathi Pariskha | Spardha Pariskha | Competition Exam | Mahapariksha Portal | Maha Portal | Mega Bharti | MSEB Bharti | MSEB Recruitment | Mahavitaran Bharti | Mahavitaran Recruitment | IBPS Exam | IBPS | Bank Probationary Officer Exam | Railway Recruitment Board Exam | Railway Recruitment Test | Arogya Vibhag Bharti | Arogya Vibhag Recruitment | Van Vibhag Vanrakshak Bharti | Van Vibhag Vanrakshak Recruitment | MSRTC Bharti | MSRTC Recruitment | MS CIT | MS-CIT Online Course | MS CIT Online Study | Bank Recruitment | Bank Exam | RTO Course | RTO Online Test | RTO License Test | Krushi Vibhag Bharti | Krushi Vibhag Recruitment | Railway Police Exam | Railway Police Recruitment | Indian Army Exam | Indian Army Recruitment

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(687)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या

x