6 May 2024 12:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट SBI Home Loan | SBI कडून 20 वर्षांसाठी गृहकर्ज घ्यायचं आहे का? महिना EMI आणि व्याज किती लागेल जाणून घ्या IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल
x

VIDEO | २-३ महिन्यात? OBC समाजाने प्रथम फडणवीसांनी धनगर समाजाला आरक्षणाचं दिलेलं हे वचन ऐकावं

Dhangar Reservation

मुंबई, २७ जून | माझ्या हातामध्ये सूत्रं दिल्यास ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देईन, अशी गर्जना करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टोला हाणला. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतही असेच वक्तव्य केले होते. ते मला चांगले आठवत आहे. त्यामुळे फडणवीस यांनी आरक्षणाच्या विषयावर राजकारण करु नये, असे संजय राऊत यांनी म्हटले.

ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी कोरोनाच्या काळातही रस्त्यावर उतरून करण्यात आलेल्या भाजपच्या ओबीसी आंदोलनाविषयी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलिसांनी याकडे लक्ष दिले पाहिजे, असे राऊत यांनी म्हटले.

पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, नागपूर, नाशिक अशा महत्त्वांच्या शहरांत तसंच तालुक्यांच्या ठिकाणी ओबीसी आरक्षण परत मिळावं, यासाठी भाजपने एल्गार केला. नागपूरमधल्या आंदोलनात फडणवीसांना ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात ओबीसी मंत्र्यांची स्थिती वाईट आहे. ओबीसी मंत्री आपल्या राजकीय मालकांच्या हाताखालचे मांजर झाले आहेत. राज्याची सूत्रे भारतीय जनता पक्षाकडे सोपविली तर दोन ते तीन महिन्यांत ओबीसी आरक्षण परत मिळवून देतो आणि जर मी हे करू शकलो नाही तर राजकीय संन्यास घेईन, अशी घोषण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

फडणवीस हे मोदींप्रमाणे आश्वासनं देण्यात माहीर झाले आहेत. तसंच आश्वासन त्यांनी काल ओबीसी समाजाला दिलं आहे. मात्र ओबीसी समाजाने त्यांच्यावर विश्वास ठेवाव अशी स्थिती नक्कीच नाही. कारण फडणवीसांनी असंच जाहीर आश्वासन धनगर समाजाला ५ नोव्हेंबर २०१७ मध्ये दिलं होतं आणि त्यात थेट घटनात्मक बदल करण्याचं देखील म्हटलं होतं. मात्र त्यांनी ते कधीच केलं नाही आणि त्यानंतर महादेव जाणकारांचं राजकीय पत्ता कट करत पडळकरांना विधान परिषदेवर पाठवत जाणकारांना बाजूला केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर नेमका कोणत्याही समजणे किंवा समाजाच्या नेत्याने विश्वास ठेवावा असं इतिहास सांगत नाही. पहा काय होता तो आश्वासनांचा व्हिडिओ;

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: What Devendra Fadnavis promised to Dhangar Community for reservation in 2017 news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x