21 April 2021 11:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
आमच्याकडे ऑक्सिजन संपला आहे, तुमचे रुग्ण घेऊन जा | यूपीत अनेक इस्पितळांचा पत्रकांचा सपाटा Health first | दातांचा पिवळेपणा नाहीसा करण्यासाठी करा हे घरगुती उपाय । नक्की वाचा नाशिक दुर्घटना अतिशय वेदनादायी, पण बेपर्वाई करणाऱ्यांना कडक शासन व्हायलाच हवं - राज ठाकरे Health first | प्रवास करताना मळमळ किंवा उल्टी होतेय तर हे करा घरगुती उपाय । नक्की वाचा PPE किट, व्हेंटीलेटर्स, लस ते ऑक्सिजन असं सर्वच प्रथम परदेशात पाठवलं | सर्वांची टंचाई भारतीय भोगत आहेत नाशिक दुर्घटना | मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त | मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर Health first | चहाचा अतिरेक करू नका नाहीतर आरोग्यावर होतील त्याचे वाईट परिणाम । नक्की वाचा
x

आधीच उद्धव ठाकरेंसमोर कोरोनाचं संकट; त्यात हा राजकीय पेच...

CM Uddhav Thackeray, Corona Crisis

मुंबई, ४ एप्रिल: जगभरातील देशांना चिंतेत टाकणाऱ्या कोरोना व्हायरसने महाराष्ट्रालाही धडक दिली आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लोकांसमोर वारंवार संयमाचं आवाहन करत आहेत आणि कठोर निर्णयही घेत आहेत. मात्र एकीकडे हे संकट सुरू असतानाच उद्धव ठाकरेंसमोर थेट मुख्यमंत्रिपद जाण्याचाच धोका निर्माण झाला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यात होणारी राज्यातील विधानपरिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हा निर्णय घेण्यात आला. येत्या २४ एप्रिल रोजी राज्य विधानपरिषदेच्या ९ जागा रिक्त होत आहेत. विधानसभेतील आमदार या निवडणुकीत मतदान करतात. मात्र कोरोनामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोग राज्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन निवडणुकीची तारीख नंतर जाहीर करणार आहे. या स्थितीमुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर नवा पेच निर्माण झाला आहे. कारण उद्धव ठाकरे हे विधानपरिषद किंवा विधानसभा अशा कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. असं असताना त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत विधीमंडळाचे सदस्य असणं गरजेचं असतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे सहा महिन्यांच्या आत म्हणजेच २७ मेच्या आधी त्यांना विधिमंडळाचे सदस्य होणे बंधनकारक आहे. देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाने या काळातील सर्व निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. विधानपरिषदेच्या निवडणुकांना जर उशीर झाला तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतली याबाबत आता चर्चा सुरु झाल्या आहेत.

 

News English Summary: Maharashtra has also been hit by the Corona virus, which is worrying countries around the world. The number of coronary arteries in the state is increasing day by day. In such a situation, Chief Minister Uddhav Thackeray is frequently appealing to the people and taking tough decisions. On the one hand, as the crisis continues, the threat of going directly to Uddhav Thackeray goes to the Chief Minister. The state Legislative Council elections in April are postponed in the wake of the lock down. The decision was taken by the Central Election Commission. On April 24, six seats in the State Legislature are vacating. Legislative legislators vote in this election. But this election has been postponed due to Corona.

 

News English Title: Story after corona virus crisis CM Uddhav Thackeray in new crisis chief minister post in danger Maharashtra News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1293)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x