27 April 2024 9:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

घाबरू नका! मे महिन्यात मुंबईत कोरोनाचे काही लाख रुग्ण वाढणार हे वृत्त खोटं - बीएमसी

Corona Crisis, Covid 19, Mumbai BMC

मुंबई, २२ एप्रिल: राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूच्या चाचण्या घेण्यात येत आहेत. आतापर्यंत ९० हजारहून अधिक चाचण्या करण्यात आल्या असून मृतांच्या दरातही घट झाली आहे. सध्याची परिस्थिती ही आशादायी असून राज्य सरकार कोरोना विषाणूच्या संकटातून सावरण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करत आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राजेश टोपे म्हणाले की, राज्यात एकूण ३८ लॅब उपलब्ध असून प्रत्येक दिवसाला ७ हजारहून अधिक चाचण्या घेणे शक्य होत आहे.

दरम्यान, मुंबईतील करोना रुग्णांची आकडेवारी ही मे महिन्याच्या मध्यापर्यंत काही लाखांमध्ये पोहोचेल, अशा आशयाच्या बातम्या बुधवारी प्रसारमाध्यमातून केंद्रीय पथकाच्या हवाल्याने प्रकाशित झाल्या आहेत. त्यावर पालिकेने लेखी स्पष्टीकरण दिले आहे. केंद्रीय पथकाने आपल्या अभ्यास दौऱ्यादरम्यान पालिका आयुक्तांसह पालिकेतील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या तसेच पालिका करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. या पथकाने पालिका प्रशासनाद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक व वैद्यकीय उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त केलेले आहे, असे पालिकेने म्हटले आहे.

त्यामुळे मे महिन्याच्या मध्यापर्यंत मुंबईत करोनाचे काही लाख रुग्ण वाढणार असल्याची विविध माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेली माहिती वस्तुस्थितीचा विपर्यास करणारी, अतिरंजित असून दिशाभूल करणारी आहे असं पालिकेने स्पष्ट केलं आहे.

 

News English Summary: The number of corona patients in Mumbai is expected to reach a few lakhs by mid-May, the Central Bureau of Investigation (CBI) said in a statement on Wednesday. The municipality has provided written explanation on it. During his study tour, the central team met with the Municipal Commissioner, senior officers of the municipality and learned about the measures the municipality is taking.

News English Title: Story Corona virus few lakh patients will be increase in Mumbai is wrong information says BMC Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x