24 April 2024 8:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
x

कोरोना व्हायरस: इराणमध्ये अडकलेले २३४ भारतीय मायदेशी परतले

News latest Updates, Covid 19,  Corona Virus, Iran

नवी दिल्लीः करोना व्हायरसने थैमान घातलेल्या इराणमधून २३४ भारतीय मायदेशात दाखल झाले आहेत. यात १३१ विद्यार्थी आणि १०३ यात्रेकरू आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराण सरकार आणि तेथील भारतीय दुतावासाचे आभार मानले आहेत. इराणहून विमानाने दिल्लीत आलेले भारतीय जैसलमेरमध्ये पोहोचलेत. एअर इंडियाच्या दोन विमानांद्वारे त्यांना जैसलमेरला सकाळी उतरवण्यात आलंय.

या सर्वांना मायदेशी परतता येईल की नाही ही चिंता त्यांना लागून राहिली होती. मात्र ही चिंता आता संपली आहे. कारण करोनाच्या दहशतीत जगणाऱ्या २३६ भारतीयांना मायेदशी आणण्यात आलं आहे. परराष्ट्र मंत्री एस. जय शंकर यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. तसंच या २३६ जणांमध्ये १३१ विद्यार्थी आहेत असंही जयशंकर यांनी म्हटलं आहे.

इराणच्या सरकारी वाहिनीने शनिवारी म्हटले की, कोरोना विषाणूग्रस्त आणखी ९७ जणांना मृत्यू झाला आहे. देशात मृतांचा आकडा ६११ झाला आहे. देशात १२,७२९ लोक या आजाराने ग्रस्त आहेत. पश्चिम आशियामध्ये इराण कोरोना विषाणूने सर्वाधिक प्रभावित झालेला देश आहे. अनेक अधिकारीही या विषाणूने ग्रस्त झाले आहेत.

 

News English Summery: There have been 234 Indians from Iran who have been arrested by the Corona virus. It has 131 students and 103 pilgrims. Foreign Minister Jaishankar thanked the Iranian government and the Indian embassy there. Indians arriving in Delhi by plane from Iran have reached Jaisalmer. He has been flown to Jaisalmer in the morning by two Air India planes. Citizens from Iran will be examined first. All corpses will be inspected in the army’s own cells in Jaisalmer. They will be released only after the investigation is completed. They will be kept here for 14 days. 58 passengers were brought from Iran on Tuesday. Then on Friday, 44 passengers were brought. Around 100 people have died from the Corona virus in Iran on Saturday. According to this, the death toll in Iran has reached 700. 13,000 people have been infected with Iran in Iran. Iran is the most affected country in West Asia.

 

News English Title: Story Covid 19 234 Indians from corona virus hit Iran reach to India News Latest Updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x