12 December 2024 1:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त
x

MP Sanjay Raut on Congress Crisis | काँग्रेसला अध्यक्ष नसणं चांगली गोष्ट नाही, भाजप फायदा घेतंय - राऊत

MP Sanjay Raut

मुंबई, ०२ ऑक्टोबर | कोणताही पक्ष असेल त्याला नेतृत्व पक्षाध्यक्ष हवाच. तेव्हा तो पक्ष काम करू शकतो. काँग्रेस पक्ष हा भारतातला सर्वात जुना पक्ष आहे. स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेस पक्षाचे मोलाचं सहकार्य आहे. असं असताना गेल्या काही वर्षापासून काँग्रेस पक्षाला अध्यक्ष नसणं ही चांगली गोष्ट नाही आणि याचा फायदा भारतीय जनता पार्टी घेत (MP Sanjay Raut on Congress Crisis) आहे. पक्षनेतृत्व असेल तर कार्यकर्ते जोमाने काम करतात असं संजय राऊत म्हणाले.

MP Sanjay Raut on Congress Crisis. Whichever party it is, it must be led by the party president. The Congress party is the oldest party in India. The Congress party has been instrumental in the freedom struggle. However, it is not a good thing that the Congress party has not had a president for the last few years and the BJP is taking advantage of this :

काँग्रेस देशातील प्रमुख विरोधी पक्ष आहे. तो राहील. भविष्यात राजकारण करताना काँग्रेस शिवाय राजकारण करता येणार नाही. पण काँग्रेस नेतृत्वाने अध्यक्षपदाचा विषय लवकरात लवकर मार्गी लावला तर विरोधी पक्षाच्या आघाडीला पुढे जाता येईल, असं राऊत म्हणाले.

काँग्रेस पक्षाचं नेतृत्व हे गांधी परिवारच आहे. तरीही पक्षाला अध्यक्ष हवाच. आता शिवसेना पक्षप्रमुख हे आमचे प्रमुख आहेत. आम्ही सर्व काम करतो. पण नेते आहेत ते. प्रमुख पदावर एक नेता असतो, तो बसून दिशानिर्देशन करत असतो. पक्षाला असा कोणी जर प्रमुख असेल तर त्यांच्या पक्षाला निश्चित गती मिळेल, असं त्यांनी सांगितलं. पक्षनेतृत्व असेल तर कार्यकर्ते जोमाने काम करतात. नवी ऊर्जा मिळते. भाजपला शह देण्यासाठी काँग्रेसने अध्यक्ष निवड करणं काळाची गरज आहे, असंही त्यांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग आणि भाजपवरही अग्रलेखातून हल्ला चढवला आहे. कॅ. अमरिंदर येतील व जातील. त्यांनी सत्तेची सर्व सुखे काँग्रेस पक्षातच भोगली आहेत. आता भोगायला उरले नाही तरीही खुर्चीचा मोह सुटत नाही. भाजप अशा अमरिंदर सिंगांना मांडीवर बसवून काय मिळवणार?, असा सवाल करतानाच केंद्रीय गृहमंत्र्यांनी पंजाबच्या लोकनियुक्त मुख्यमंत्र्यांना डावलून काँग्रेसने दूर केलेल्या व आमदारांचा पाठिंबा गमावलेल्या अमरिंदर सिंग यांच्याशी सीमा सुरक्षेबाबत चर्चा करणे बरोबर नाही असं त्यात म्हटलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: MP Sanjay Raut on Congress Crisis after Punjab politics at high level.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x