उद्धव ठाकरेंना पार्ट-टाइम सीएम म्हणणारे फडणवीसांचे खास मित्र सीटी रवी यांना कर्नाटकच्या मतदाराने फुल-टाईम घरी बसवलं, मजबूत पराभव
Karnataka Assembly Election Result 2023 | कर्नाटकातील काँग्रेसच्या वादळात भाजपच्या दिग्गजांनाही आपली जागा वाचवता आलेली नाही. कर्नाटकातील भाजपचा मोठा चेहरा तसेच मोदी-शहा ते RSS चे खास असलेले आणि महाराष्ट्राचे प्रभारी सीटी रवी यांचाही पराभव झाला आहे. काँग्रेसच्या एच. डी. थम्मैय्या यांनी त्यांचा पराभव केला. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि चिकमंगळूर मतदारसंघातून चार वेळा आमदार राहिलेले सी. टी. रवी यांनी आपला मानहानीकारक पराभव स्वीकारला आहे. कर्नाटकात त्यांनी स्थानिक नेत्यांवर तिकीट वाटपात प्रचंड अन्याय केला होता आणि त्यांच्याविरोधात स्थानिक भाजप नेत्यांमध्येही राग होता. परिणामी त्यांच्या पराभवाने भाजपमधील अनेक स्थानिक नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
कोण आहेत एच.डी.थम्मैया?
खरं तर एचडी थम्मैया हे भाजप नेते बीएस येडियुरप्पा यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी सीटी रवी यांचा ५ हजार ९२६ मतांनी पराभव केला. यापूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा यांना पक्षाचे तिकीट दिले जाणार नाही, असे येडियुरप्पा यांच्याविषयी वक्तव्य केल्याने सीटी रवी चर्चेत आले होते. ते अत्यंत उन्मत्त स्वभावाचे असल्याचं मत स्थानिक भाजप नेत्यांमध्ये आहे.
कोणाला किती मते मिळाली?
निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, एचडी थम्मैया यांना 85054 तर सीटी रवी यांना 79128 मते मिळाली. चिकमंगळूर हा मध्य कर्नाटकातील एक मतदारसंघ आहे. 2018 मध्ये सीटी रवी यांनी काँग्रेसच्या शंकर बीएल यांचा 26 हजार 314 मतांनी पराभव केला होता. सीटी रवी २००४ पासून ही जागा जिंकत आहेत.
१ वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंवर टीका
महाराष्ट्रात मुख्यमंत्री (तत्कालीन) उद्धव ठाकरे केवळ पार्ट टाईम मुख्यमंत्री आहेत. ते कधी झोपतात, कधी उठतात आणि कधी काय करतात हे कुणाला सांगता येत नाही. राज्याला देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा एक फुलटाईम मुख्यमंत्री हवा आहे. हिंमत असेल तर विधानसभा भंग करून नव्याने निवडणूक घ्या. राज्यातील जनता या निवडणुकीसाठी सज्ज आहे असे आव्हान सीटी रवी यांनी १ वर्षांपूर्वी दिले होते. मात्र आता भाजपचं महाराष्ट्रात निवडणुकीपासून दूर पळत असल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे कालच्या कर्नाटकातील निवडणुकीच्या निकालात सीटी रवी यांनाच मतदाराने फुल-टाईम घरी बसवलं आहे. त्यामुळे आता ते कधी झोपतात, कधी उठतात आणि कधी काय करतात याच्याशी जनतेला काहीही देणं घेणं राहणार नाही असं चित्र आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Karnataka Assembly Election result 2023 congress HD Thammaiah defeats BJP CT Ravi in Chikmagalur check details 14 May 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
- Government Job | महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात 219 रिक्त पदांसाठी भरती, पगार 1,42,400 रुपये
- Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
- Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत अपडेट, पेनी शेअर घसरणार की तेजीत येणार - NSE: IDEA