3 November 2024 4:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने कमाई होणार, फायदा घ्या - NSE: IRFC Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON Quant Small Cap Fund | बापरे, 18 पटीने पैसा वाढवते 'या' फडांची योजना, मिळेल 1,07,35,937 रुपये परतावा - Marathi News NBCC Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार NBCC शेअर, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: NBCC EPFO Pension | नोकरदारांनो, EPFO सदस्यांना नेमकी पेन्शन किती, तुम्ही पेन्शनसाठी पात्र आहात का, या गोष्टी जाणून घ्या - Marathi News Home Loan Charges | घर खरेदी करताना नेमके कोणकोणते चार्जेस घेतले जातात, योग्य डिटेल्ससह अचूक माहिती जाणून घ्या RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर पुन्हा मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले महत्वाचे संकेत, संधी सोडू नका - NSE: RVNL
x

Eknath Khadse Vs MLA Chandrakant Patil | खडसेंनी माझ्या संदर्भात लेव्हल सोडून बोलू नये अन्यथा...

Eknath Khadse Vs MLA Chandrakant Patil

जळगाव, ०२ ऑक्टोबर | जळगावमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse Vs MLA Chandrakant Patil) यांच्यामध्ये वाद उफाळून आला आहे ‘एखादा शूटर लावून मला मारून टाका’ अशी मागणीच पाटील यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आज बोदवड येथे एका व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत माहिती देत मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता टीका केली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन एकनाथ खडसेंवर हल्लाबोल केला.

Eknath Khadse Vs MLA Chandrakant Patil. Shivsena MLA Chandrakant Patil has demanded to shoot me with a shooter. NCP leader Eknath Khadse had given information about a viral audio clip in Bodwad today without mentioning his name at Muktainagar :

‘खडसे हे आजही मी युती तोडण्याबद्दल अहंकाराने सांगतात, सध्या एकनाथ खडसे यांचा डोकं ठिकाणावर नसून पक्ष बदलल्यानंतर देखील त्यांना अजूनपर्यंत काही मिळाले नाही. त्यातच भोसरी भूखंड प्रकरणात खडसेंना कधी लपावं लागतं तर कधी पळावं लागतं अशी परिस्थिती असताना तीन तीन वेळा कोविड त्यांना होतो. त्यामुळे त्यांच्याविषयी मला सहानुभूती असल्याची मिश्कील टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.’एकनाथ खडसे यांनी माझ्या संदर्भात लेव्हल सोडून बोलू नये एकनाथ खडसे यांनी लेव्हल सोडल्यास मी देखील लेव्हल सोडून बोलेल. मी खडसे यांचा कधीही अनादर केला नसून बोलताना मात्र एकनाथ खडसे आणि तोंडाला कुलूप लावावे’ असंही पाटील म्हणाले.

‘व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत एकनाथ खडसे हे माझे नाव जोडत असून खडसेंनी ही क्लिप मतदारसंघातील सर्व मतदारांपर्यंत पोहोचावी. जेणेकरून कोणाची काय पात्रता आहे हे मतदारांना कळेल. मी व माझे कुटुंब अत्यंत साधेपणाने जगतोय. त्यामुळे खडसेंना असं वाटत असेल तर त्यांनी एखादा शूटर लावून मला मारुन टाकावे, माझी छोटे कुटुंब असून माझा बाजूने कोणी बोलणारेही नाही , आजही मी रात्री 10 वाजता घराला कुलूप लावून राहतो ही स्थिती आहे’ असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Eknath Khadse Vs MLA Chandrakant Patil political war in Jalgaon.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x