23 September 2019 11:12 AM
अँप डाउनलोड

आधार मनसे टॅंकरचा, उद्धव ठाकरे परदेशात तर मुख्यमंत्र्यांचं मोबाईलवर दुष्काळ निवारण

MNS, Raj Thackeray, Loksabha Election 2019

उस्मानाबाद : सध्या ग्रामीण महाराष्ट्रात ऐतिहासिक दुष्काळ पडला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील दुष्काळ दौऱ्यावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. तर राज ठाकरे यांची मनसे अनेक गावांमध्ये पाण्याच्या समस्येतून सुटका करण्यासाठी गावकऱ्यांना शक्य ती मदत करत आहेत. वाढलेली उष्णता आणि दुष्काळाला तोंड देत आसलेल्या उस्मानाबादची तहान मनसेचा टॅंकर भागवताना दिसतोय.शहरातील पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या लोकांना या टॅंकरचा चांगलाच आधार होत आहे.

उजनीच्या पाण्यासाठी होत आसलेले राजकारण आणि तिव्रतेचा दुष्काळ या वातावरानामध्ये संध्या उस्मानाबादकर सापडले आहेत. शहरामध्ये १५ ते २० दिवसाला पाणी मिळत आसल्याने नागरीक परेषान आहेत. या परिस्थितीमध्ये कुठेतरी लोंकाना थोडीफार मदत व्हावी यासाठी मनसेचे जिल्हा सचीव दादा कांबळे यांनी पुढाकार घेवून उस्मानाबाद शहरात एक टॅंकर चालु केला आहे. या मुळे शहरातील काही भागातील लोकांची तहान भागत आसुन तिव्र टंचाईमध्ये लोकांना आधार मिळत आहे.

मनसे रस्त्यावर उतरली असताना दुसरीकडे सत्तेत असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र जवाबदारी विसरून परदेश दौऱ्यावर निघून गेले आहेत. त्यात भर म्हणजे मुख्यमंत्री सध्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा मोबाईल फोनवरून घेण्याचा इतिहास रचत आहेत आणि मंत्रिमंडळ विस्तारावर केंद्रित होऊन विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

अनुरूप वधू - वर सुचक मंडळ

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(405)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या