12 December 2024 3:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

भाजपचे आमदार फुटू नयेत म्हणून वरिष्ठ त्यांना सत्ता येण्याचं लॉलीपॉप दाखवत आहेत - भुजबळ

BJP leaders, Devendra Fadnavis, Minister Chhagan Bhujbal

मुंबई, १७ जुलै: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ही भेट राजकीय नव्हती. आम्हाला सरकार पाडण्यात काहीही कुठलाही रस नाही. आत्ता कोरोनाची लढाई सुरु आहे. त्यामुळे कोरोनाच्या संदर्भात आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ही भेट होती. महाराष्ट्रातली कोरोनाची परिस्थिती मी अमित शाह यांच्या कानावर घातली आहे. तसेच फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यामुळे पुन्हा राज्यातील सरकार पडणार अशी चर्चा सुरु झाली.

मात्र राज्यातील भाजपचे आमदार फुटू नयेत यासाठीच देवेंद्र फडणवीस आणि अन्य वरिष्ठ नेत्यांकडून सत्ता परत येण्याचे लॉलीपॉप दाखवले जात असल्याची खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली. ते शुक्रवारी नाशिकमध्ये प्रसारमध्यमांशी बोलत होते. तत्त्पूर्वी आज दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाली. यावर भुजबळ यांनी खोचक टिप्पणी केली.

पुढे त्यांनी म्हटले की, राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार पाच वर्षे चालणार आहे. या काळात भाजपच्या आमदारांनी इकडे-तिकडे बघू नये म्हणून वरिष्ठांकडून त्यांना सत्ता परत येणार, असे लॉलीपॉप दाखवले जात असल्याचे भुजबळ यांनी म्हटले.

 

News English Summary: NCP leader Chhagan Bhujbal slammed Devendra Fadnavis and other senior leaders for showing lollipops to return to power so that BJP MLAs in the state would not split.

News English Title: BJP leaders for showing lollipops to return to power so that BJP MLAs in the state would not split says Chhagan Bhujbal News Latest Updates.

हॅशटॅग्स

#ChhaganBhujbal(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x