एकत्र लढूनही तुमच्या ९८ जागा आल्या आणि भाजपच्या एकट्याच्याच १०५ - चंद्रकांत पाटील

कोल्हापूर, १३ जुलै : संजय राऊत यांनी घेतलेल्या शरद पवारांच्या मुलाखतीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी या मुलाखतीवर टीका केली असून महाविकासआघाडीला आव्हान देखील दिलं आहे.
सामनामध्ये शरद पवार यांची ऐतिहासिक मुलाखत होणार म्हणून सामनाचा सेल वाढवला. या मुलाखती मधून सरकार स्थिर आहे, हे सरकार बदलत नाही हा संदेश द्यायचा होता. या मुलाखातीमधून प्रशासनामध्ये चलबिचल पण सुरू होती. ती थांबवायची होती. तुम्ही वेगवेगळे लढून पाहायला होत. महाराष्ट्रात एकदा टेस्ट होऊन जावू द्या. असं आव्हान यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.
सर्वांनी वेगवेगळे लढून पाहू. प्रामाणिक लढायचं. पण दोन दिवस आधी सेटलमेंट करायचं नाही. शरद पवार यांनी सत्तेचा दर्प म्हटलं. पण लोकांनी मतपेटीतून तस काही म्हटलं नाही. आम्ही काही म्हटलं, तर आमचे राऊत काहीही लिहितात अशी टीका देखील त्यांनी केली.
पुढे प्रसार माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले, “शरद पवार यांनी महाविकास आघाडीचं सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असं म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या आमदार, कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच प्रशासनाला हे सरकार ५ वर्षे टिकणार आहे, हा संदेश देण्याचा प्रयत्न झाला. संजय राऊत सरकार पाडून दाखवा, असं म्हणत आहेत. पण सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. तुम्ही वेगळे लढला असता, तर राष्ट्रवादीच्या २० आणि काँग्रेसच्या १० जागा निवडून आल्या असत्या. एकत्र लढूनही तुमच्या ९८ जागा आल्या आणि आमच्या एकट्याच्याच १०५ निवडून आल्या आहेत,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
News English Summary: BJP state president Chandrakant Patil has reacted to Sanjay Raut’s interview with Sharad Pawar. This time, he has criticized the interview and also challenged the Mahavikasaghadi.
News English Title: BJP State President Chandrakant Patil Reaction On Sharad Pawar Interview News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Advance Tax | तुम्ही ऍडव्हान्स टॅक्सच्या पहिला हप्ता भरला का? | ही तारीख चुकल्यास महागात पडेल
-
Agneepath Scheme | सीमेवर देशासाठी सेवा बजावणं सुद्धा कंत्राटी नोकरीचा प्रयोग? | देशभर मोदी सरकारविरोधात रोष
-
Gold ETF Investment | हा गोल्ड फंड 64 टक्के परतावा देत संपत्ती वेगाने वाढवतोय | तुम्ही गुंतवणूक केली आहे का?
-
Business Idea | गुंतवणूक न करता हा व्यवसाय सुरु करा | महिन्याला 50,000 रुपयांची कमाई
-
5G Internet in India | तुमच्या इंटरनेट स्पीडमध्ये 10 पटीने वाढ होणार | ऑनलाईन उद्योगांनाही गती येणार
-
Multibagger Penny Stocks | या २ रुपयाच्या शेअर गुंतवणूकदारांचं आयुष्य सार्थकी लागलं | 1 लाखाचे 2.5 कोटी झाले
-
Dayaben Entry VIDEO | दयाबेनच्या मालिकेत परत येण्यावर जेठालालने म्हटले 'तिने आम्हाला पुन्हा उल्लू बनवलं'
-
Inflation Hike | पेट्रोल-डिझेलचे दर आणि महागाई अजून वाढणार? | ही कारणं समोर येतं आहेत
-
Shukra Rashi Parivartan | शनिवार 18 जूनपासून हा ग्रह पंच महापुरुष योग बनवत आहे | या राशी राहतील भाग्यशाली
-
Fuel Shortage Crisis | यूपीत डिझेल-पेट्रोलचं संकट | देशातील भाजपशासित राज्यातच सर्वात मोठ्या अडचणी