23 April 2025 11:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसमध्ये 3000 रुपये जमा केल्यास 5 वर्षांत किती मिळतील? अशी ठरवा बचत रक्कम SBI Car Loan | कार खरेदी करण्यासाठी हा आहे सर्वोत्तम बँक पर्याय, 7 लाखाच्या कार लोनवर इतका EMI द्यावा लागेल HDFC Mutual Fund | पगारदार महिना केवळ 1,000 रुपये SIP वर मिळवत आहेत 2 कोटी रुपये परतावा, बिनधास्त पैसा कमवा Horoscope Today | 24 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 24 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rattan Power Share Price | पेनी स्टॉकमध्ये जबरदस्त तेजीचे संकेत; मार्केट तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: RTNPOWER SJVN Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या पीएसयू शेअरबाबत फायद्याचे संकेत, रेटिंग सह टार्गेट अपडेट - NSE: SJVN
x

शेतकऱ्यांना वीज बिल भरावच लागणार हा साधा सरळ अर्थ असताना फडणवीसांनी गोलगोल वाक्य फिरवण्याची कला दाखवली

Viral Video

Viral Video | उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यातून खास ठाकरी शैलीतून राज्य सरकारचा समाचार घेतला. सरकारवर चौफेर टिका करत त्यांनी जाब विचारला. हे सरकार आश्वासनांची खैरात करणारं आहे, पण प्रत्यक्षात कोणाच्याच पदरात काहीच पडणार नसल्याचे, सांगायला ते विसरले नाहीत. या मेळाव्याला हजारो शेतकरी आणि शिवसैनिकांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेले खासदार प्रतापराव जाधव यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा हा शेतकरी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तुमच्याकडे बघून धगधगत्या मशाली वाटत आहेत. सरकार कशा पद्धतीने पाडले गेले, ते तुम्ही पाहिले. नितीन देशमुख यांना नेले होते, ते परत आले. काय झाडी काय डोंगर एकदम ओके होते. मी जिजाऊच्या भूमीवर शेतकरी आशीर्वाद घ्यायला आलोय.

व्हिडीओ ऐकवल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आवाज आला तुम्हाला? ओळखा पाहू कोण? काय बोलत होते. मी तेव्हा मुख्यमंत्री होतो. देवेंद्र जनाची नाही, तर मनाची लाज बाळगा. या ठिकाणी आम्हाला आनंद होतोय की, त्या ठिकाणी मध्य प्रदेश सरकारने शेतकऱ्यांचे साडे सहा हजार कोटींचे वीज बिल भरले आहेत. म्हणून आम्ही या ठिकाणी फोडतोय की त्या ठिकाणी आवाज जाईल,’ असं म्हणत ठाकरेंनी फडणवीसांना कोपरखळी मारली.

शेतकऱ्यांच्या वीजबिलावरून घणाघात करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आज डीपी जळताहेत. किती लोक तुमच्याकडे मदतीला येताहेत? डीपी जळाल्यानंतर तुम्हाला पटकन रिपेअर करून मिळतो. वीज बिलाची वसुली सुरूये की थांबलीये? थांबा एक व्हिडीओ मला मिळालाय, तो तुम्हाला ऐकवतो”, असं म्हणत ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांनी मध्य प्रदेश सरकारने केलेल्या वीज बिल माफीबद्दलचा व्हिडीओ लावला.

शेतकरी वीज बिल माफी – फडणवीसांनी ठाकरेंना दिलं उत्तर
‘काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही…! 2019 ते 2022 या मधल्या काळातील त्यांचा शेतकऱ्यांप्रति पोकळ कळवळा महाराष्ट्राने अनुभवलाय…’, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ ट्विटवर शेअर केलाय. या व्हिडीओबरोबरच देवेंद्र फडणवीसांनी महावितरणचा एक आदेशही पोस्ट केला आहे. हा आदेश पोस्ट करताना फडणवीस म्हणतात, ‘जे बोलतो ते करतो. फुकाच्या हवेत गप्पा मारत नाही. महावितरणचा हा आदेश 22 नोव्हेंबर 2022 रोजीच जारी झालेला आहे. शेतकर्‍यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे’, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केलाय.

भाजपचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल :
भाजपच्या ट्विटर हॅण्डलवरून काही ट्विट्स करण्यात आलेत. ज्यात उद्धव ठाकरेंनी चिखलीतल्या सभेत केलेल्या टीकेला उत्तर दिलंय. ‘मिस्टर उद्धव ठाकरे, 2.5 वर्षे घरात स्वतःला कोंडून घेतलं होतं तुम्ही. आज सत्ता गेल्यानंतर शेतकरी आठवला. 2 वर्षे ओला दुष्काळ होता किती रुपयांची मदत शेतकऱ्यांना केली? कृषी वीज बिल संदर्भात तुम्ही बोलू नये, राज्यात 5 लाखांच्या वर शेतकऱ्यांच्या शेतातील वीज कनेक्शन तुम्ही तोडलीत’, असं भाजपनं म्हटलंय.

निर्णय काय
वीजेचं बिल न भरलेल्या शेतकऱ्यांचं कनेक्शन महावितरण कापणार होतं. परंतु त्यांच्या या निर्णयाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली होती. शेतकऱ्यांनी केवळ चालू बिल भरलं तरी देखील त्यांचं कनेक्शन कायम ठेवलं जाणार असल्याची घोषणा फडणवीसांनी केली होती. वास्तविक या निर्णयाचा अर्थ म्हणजे शेतकऱ्यांना वीजबिल माफी होणार नाही आणि त्यांना वीजबिल भरावच लागणार आहे असा होतो, परंतु फडणवीस त्यांच्या राजकीय कलाकौशल्याने साधा सरळ विषय गोलगोल फिरवून मांडत असल्याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video Uddhav Thackeray rally at Buldhana Check details on 27 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या