5 December 2024 1:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY NTPC Green Share Price | मालामाल करणार NTPC ग्रीन शेअर, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - NSE: NTPCGREEN SIP Mutual Fund | ढीगभर पैसा जमा करायचा आहे मग, 'या' गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या नाहीतर सगळंच गमावून बसाल Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
x

MLA Gopichand Padalkar | आ. पडळकरांचे वक्तव्य बेजबाबदार, राजकीय आकसापोटी केलेले - श्री. मार्तंड देवस्थान

BJP MLA Gopichand Padalkar

पुणे, १६ सप्टेंबर | देवस्थानाच्या जमिनी बाबत सुप्रिम कोर्टाने दिलेल्या निर्णयावरून भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. पडळकरांच्या या आरोपावरुन आता श्री. मार्तंड देवस्थानाने आपले मत मांडले आहे. जेजुरी येथील श्री. मार्तंड देवस्थानाच्या मालकीच्या जमिनीत कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप किंवा ताबा नसून कृपया देवस्थानाच्या कामामध्ये कोणीही राजकारण करू नये, अशा शब्दात श्री. मार्तंड देवस्थानने या जमिनींवर राजकीय ताबा असण्याच्या आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट केलीय.

MLA Gopichand Padalkar, आ. पडळकरांचे वक्तव्य बेजबाबदार, राजकीय आकसापोटी केलेले – A statement made by BJP MLA Gopichand Padalkar is irresponsible and politically affected says Shree Martand Dev Sansthan Jejuri Trust :

पुढे असं सांगितलं आहे की, या सर्व जमिनी देवस्थानाच्या मालकीच्या असून त्या-त्या गावातील शेतकरी या जागांमध्ये वहिवाटीत आहेत. शोध घेतलेल्या जमिनींबाबत देवस्थान नि:पक्षपातीपणे काम करत आहे. तरी कोणीही राजकीय आकसापोटी बेजबाबदार वक्तव्ये करू नयेत. अशी विनंती देखील श्री. मार्तंड देवस्थानाच्या विश्वस्त मंडळाकडून करण्यात आली आहे.

श्री मार्तंड देवसंस्थानाचे प्रमुख विश्वस्त पंकज एकनाथ निकुडे पाटील यांनी सांगितलं आहे की, जेजुरीच्या श्री मार्तंड देवसंस्थाना मालकीच्या खेड तालु्क्यातील चाकण, पुरंदर तालुक्यातील पिसर्वे, इंदापूर तालुक्यातील सणसर व तरंगवाडी, फलटण तालुक्यातील गिरवी व सांगवी आणि सातारा तालु्क्यातील देगाव व लिंब येथे जमिनी आढळून आलेल्या आहेत. या सर्व जमिनी देवसंस्थानाच्या मालकीच्या आहेत. काही शेतकऱ्यांनी देवसंस्थानाशी संपर्क देखील साधलेला आहे. तसेच, देवसंस्थान हे धार्मिक न्यास आहे, तरी याबाबत कोणीही राजकीय आकसापोटी बेजबाबदार विधाने करू नयेत, अशी विंंनंती त्यांनी केली आहे.

काय म्हणाले होते पडळकर?
आमदार गोपीचंद पडळकर यांनी ‘काका-पुतण्या’ असा उल्लेख करत टीका केली आहे. पडळकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानत या १३३ एकर जमिनीवर कब्जा केल्याचा गंभीर आरोप केला होता. लवकरच हे जगापुढे उघड होईल, असेही पडळकर म्हणाले. परंतु, श्री. मार्तंड देवस्थानाने गोपीचंद पडळकर यांचे हे आरोप बेजबाबदारपणे केलेले असल्याचे म्हणत ते फेटाळून लावले आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: A statement made by BJP MLA Gopichand Padalkar is irresponsible and politically affected says Shree Martand Dev Sansthan Jejuri Trust.

हॅशटॅग्स

#GopichandPadalkar(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x