25 April 2024 5:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार? Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, अवघ्या 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा
x

कोरेगाव-भीमाचा तपास केंद्राला कदापिही देणार नाही: मुख्यमंत्री

Story Koregaon Bhima, Elgar Parishad, CM Uddhav Thackeray, Sharad Pawar

सिंधुदुर्ग : राज्यात गेल्या काही दिवसांपासून एल्गार परिषदेबरोबरच कोरेगाव भीमा प्रकरण चर्चेत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एल्गार परिषदेसंदर्भातील तपासावर संशय व्यक्त केला होता. याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली होती. मात्र, हा याप्रकरणाचा तपास केंद्र सरकारनं एनआयएकडे दिला. या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा खुलासा केला आहे. “कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास केंद्राकडं दिलेला नाही. देणार नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरण या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. केंद्र सरकारने एल्गार परिषदेचा तपास स्वत:कडे घेतला आहे. कोरेगाव-भीमाचा नाही, असं सांगतानाच कोरेगाव-भीमात दलित बांधवांवर अत्याचार झाला असून हा तपास केंद्राकडे कोणत्याही परिस्थितीत देणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

राष्ट्रवादी काँग्रेसने याप्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. मात्र शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर काही तासातच केंद्र सरकारने या प्रकरणाची एनआयएमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यावरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वादविवाद होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे बोलत होते.

एल्गार आणि कोरेगाव भीमा या प्रकरणावरुन असलेल्या संभ्रमावर मुख्यमंत्री म्हणाले की, “एल्गार परिषद प्रकरण आणि कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण हे दोन वेगळे विषय आहेत. दलित बांधवांचा विषय कोरेगाव भीमाशी संबंधित आहे. याचा तपास मी केंद्राकडे दिलेला नाही, केंद्राकडे देणार नाही. कोरेगाव भीमामध्ये दलितांवर अन्याय झाल्याचा आक्षेप आहे. त्याबाबत मी स्पष्ट सांगतो की, कोणत्याही परिस्थितीत दलित बांधवांवर अन्याय होऊ देणार नाही. त्यामुळे एल्गार हा वेगळा विषय आहे. दलितांशी संबंधित असलेला कोरेगाव भीमा प्रकरण हा वेगळा विषय आहे. केंद्र सरकारने ज्या प्रकरणाचा तपास आपल्याकडून काढून घेतला आहे ते एल्गार प्रकरण आहे, कोरेगाव भीमाचं नाही. त्यामुळे कृपा करुन कोणीही गैरसमज करुन घेऊ नका असं मुख्यमंत्री म्हणाले.

 

Web Title: Story Koregaon Bhima and Elgar Parishad are different issues says CM Uddhav Thackeray.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x