12 October 2024 5:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank FD Interest | 5 वर्षांसाठी केलेली FD 1 वर्षातच तोडायची असल्यास व्याज मिळेल की उलट पैसे कापले जातील No Cost EMI | नो कॉस्ट EMI खरंच फायद्याचा असतो, खरंच फ्री सुविधा मिळते का, असा असतो खेळ - Marathi News Nippon India Small Cap Fund | बापरे, महिना रु.10,000 SIP करा, ही योजना 1 कोटी 53 लाख रुपये परतावा देईल - Marathi News TCS Share Price | टाटा ग्रुपचा IT शेअर देणार मोठा परतावा, TCS स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TCS Manmauji Movie Release Date | एका तरुणासाठी स्त्रियांना झालंय प्रेमाचं लागीर, 'मनमौजी' सिनेमाची रिलीज डेट जाहीर IREDA Share Price | PSU IREDA शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | डिफेंस क्षेत्रातील शेअर रॉकेट तेजीत परतावा देणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO
x

पुणे | सामान्य कार्यकर्त्याला सोबत घेऊन जाणाऱ्या वसंत मोरे यांच्याकडे मनसे शहराध्यक्ष पद

MNS corporator Vasant More, Pune city president, Raj Thackeray

पुणे, ०३ मार्च: थोडा उशीर झाला पण योग्य निर्णय झाल्याचं सध्या पुण्यातील मनसेच्या नवनियुक्त्यांवरून म्हणता येईल. कारण पुण्यातील सामान्य कार्यकर्त्याला स्वतःसोबत पुढे घेऊन जाणारे पुण्यातील मनसेचे विद्यमान नगरसेवक वसंत मोरे म्हणजे कार्यकर्त्यांचे तात्या याची मनसे पुणे शहराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आगामी महापालिकेच्या निवडणूकीच्या वर्षभर आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे विभागात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यमान शहराध्यक्ष अजय शिंदे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात बैठक घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी पदाधिकाऱ्यांना मुंबईला बोलावले होते. मुंबईमध्ये या नियुक्त्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली.

दरम्यान, वसंत मोरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुण्यातील आक्रमक आणि विकास कामं तडीस घेऊन जाणारा चेहरा म्हणून सर्वांना माहित आहे. आपल्यातील सामान्य कार्यकर्ता देखील भविष्यात पुढे जावा यासाठी त्यांनी मार्गदर्शन कार्यशाळा देखील आयोजित केल्या होत्या. पुण्यातील काही कुचकामी नेत्यांनी मागील काही काळापासून त्यांच्याविरुद्ध राजकारण केल्याने त्यांनी समाज माध्यमांवर खदखद देखील व्यक्त केली होती.

पडत्या काळात देखील ते पक्षासोबत ठामपणे उभे राहिले आणि नगरसेवक साईनाथ बाबर यांच्यासोबत मनसेच्या बाजूने पुणे महानगपालिकेत त्यांनी खिंडार लढवत पक्षाला पुढे केले. मागील २०१२ च्या निवडणुकीत मनसेचे २८ नगरसेवक निवडुन आले होते. त्यावेळी गटनेते म्हणुन मोरे यांनी या गटाचे नेतृत्व केले होते. २०१७ च्या निवडणुकीत पालिकेत मनसेचे २ नगरसेवक निवडुन आले होते. त्यातही वसंत मोरे आणि साईनाथ बाबर हे दोघे नगरसेवक कायम वेगवेगळे आंदोलने करत चर्चेत राहीले. वसंत मोरे यांना अखेर संधी दिल्याने सामान्य कार्यकर्ते खुश असल्याचं पाहायला मिळतंय.

 

News English Summary: Major changes have been made in the Pune division of Maharashtra Navnirman Sena throughout the year before the forthcoming municipal elections. Maharashtra Navnirman Sena’s current city president Ajay Shinde has been appointed as the state vice president. A few days ago, MNS president Raj Thackeray had held a meeting in Pune. After that, he had called the office bearers to Mumbai today. The appointments were officially announced in Mumbai.

News English Title: MNS corporator appointed as new Pune city president before upcoming election news updates.

हॅशटॅग्स

#VasantMore(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x