19 July 2019 9:43 AM
अँप डाउनलोड

'माझं नाव शिवसेना, पण लोकं माझ्याकडे का येईना'; प्रश्न घेऊन सामान्यांची धाव मनसेकडे का? सविस्तर

‘माझं नाव शिवसेना, पण लोकं माझ्याकडे का येईना’; प्रश्न घेऊन सामान्यांची धाव मनसेकडे का? सविस्तर

मुंबई : एक काळ असा होता की सामान्य मराठी माणूस कोणत्याही दैनंदिन समस्यांनी किंवा अन्यायाने हतबल झाला की पहिली धाव ही शिवसेनेचे तत्कालीन नेते आनंद दिघे आणि त्यांच्यासारख्या आक्रमक पणे न्याय मिळवून देणाऱ्या नेत्यांच्या कार्यालयाबाहेर रीघ लावायचे. आजच्या बदलत्या काळात आणि बदलत्या राजकीय समीकरणात शिवसैनिक देखील बदलले आहेत. सत्तेत असून देखील मराठी माणसं मातोश्रीवर समस्या घेऊन रीघ का लावत नाही हे सर्वश्रुत आहे. सध्याच्या कार्यकर्त्यांना देखील रक्तदान शिबीर आणि इतर छोट्या मोठ्या वस्तूंचे वाटप म्हणजेच लोकांच्या समस्या असा भ्रम झाल्याने ‘कार्य शिवसेनेचे’ असे टॅग वापरून नित्याची मार्केटिंग पाहायला मिळाले.

मागील निवडणुकीत ‘मी! माझं नाव शिवसेना’ अशा टॅगलाईनने सामान्य माणसाशी संबंधित अनेक प्रश्नांना अनुसरून जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. पण जमिनीवरील वास्तव वेगळंच असून सत्तेत असून देखील ‘माझं नाव शिवसेना, पण माझ्याकडे कोणीच येईना’ अशी टॅगलाईन चालवण्याची वेळ आली आहे. सामान्य मराठी माणूस हा आज अनेक आर्थिक फसवणुकीत, राहती घरं अशा समस्यांनी ग्रस्त आहे. त्यात केवळ गरीब मराठी वर्गच नाही तर मध्यम वर्गातील मराठी माणूस देखील गुरपटला आहे. सत्तेत आल्यापासून अशा आर्थिक फसवणूक झालेल्या आणि राहती घरं हुसकावून घेतलेल्या किती मराठी लोकांना शिवसेनेच्या आजच्या कार्यकर्त्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी न्याय मिळवून दिला आहे हा संशोधनाचा विषय आहे. वास्तविक शाखांमध्ये अशा विषयांमध्ये शिवसैनिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी हात घालण्याची हिम्मतच करत नाहीत हे वास्तव आहे. सामान्य माणसं सोडा इथे स्वतःच्या हक्काचं घर गमावून बसलेले देखील मनसेच्या आश्रयाला जात आहेत आणि हे उदाहरण शिवसेनेतील चित्र सांगायला बोलकं आहे

हा त्याचा व्हिडिओ पुरावा;

आज अपवाद वागल्यास अनेक शिवसैनिक पदाधिकारी हे स्थानिक स्तरावरील आर्थिक हितसंबंधात अडकले आहेत हे तिथे राहणारे मराठी लोकंच सांगतात. अगदी प्रत्येक शाखेच्या क्षेत्रात येणारे फेरीवाल्याचे स्टॉल आणि त्यासाठी लागणारी छोटीशी जागा विभागाध्यक्ष, गटप्रमुख, शाखाप्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आपसात वाटून घेतल्या आहेत आणि त्यातून आर्थिक हितसंबंद जपायचे आणि स्वतःसोबत फेरीवाल्याना देखील आपला मतदार बनवायचं असं हे चिरंतर चालणारं चक्र आहे. त्यांच्याप्रती आर्थिक फसवणूक झालेल्या आणि राहती घरं गमावून बसलेली मराठी माणसं हितसंबंधात येत नसल्याने, समस्या घेऊन गेले तरी त्याकडे दुर्लक्ष करायचं हा मराठी माणसाचा नित्त्याचा अनुभव झाला आहे.

त्यामुळेच जिथे हिम्मत त्याचीच किंमत हे सत्य स्वीकारून आज मराठी माणूस मनसेच्या अविनाश जाधव, नितीन नांदगावकर आणि तुलसी जोशी यांच्या भेटी घेण्यासाठी कार्यालयाबाहेर रीघ लावताना दिसतो. त्यात सर्वाधिक प्रमाण हे आर्थिक फसवणूक झालेले आणि आयुष्याची संपूर्ण कमाई स्वतःच घरं घेण्यासाठी घालवल्यानंतर बांधकाम व्यावसायिकाकडून फसवणूक झालेल्यांचे प्रमाण लक्षणीय असते. यातील अनेकांना जेव्हा शिवसेनेकडे का नाही गेलात, यावर ज्या प्रतिक्रिया देतात त्या परिस्थितीचा अंदाज द्यायला पुरेशा असतात. म्हणजे एक काळ असा होता जेव्हा तुलसी जोशी यांच्यासारखा सामान्य कार्यकर्ता शिवसैनिक होता आणि राज ठाकरे शिवसेनेत असताना ते कट्टर राज ठाकरे यांचे समर्थक होते. मात्र त्यावेळी सामान्य शिवसैनिक असताना ते देखील स्वतःच्या समस्या घेऊन त्यावेळी प्रसिद्ध असणारे धर्मवीर आनंद दिघे यांच्याकडे मदतीसाठी जायचे आणि आनंद दिघे त्यांना स्वतःच्या लेटरहेड’वर थेट पालघरच्या शिवसैनिक आमदारांना मदतीचे आदेश द्यायचे. त्यांनी आमच्या प्रतिनिधीसोबत ते पत्र देखी आठवण म्हणून शेअर केलं. म्हणून आज मी सामान्यांना मदत करण्याचा आनंद दिघे यांचा वारसा आणि राज ठाकरेसाहेब यांचं आक्रमक नैत्रुव यांची सांगड घालून मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी झटतो असं सांगितलं.

काय होतं ते धर्मवीर आनंद दिघे यांचं नेमकं पत्र;

तर दुसऱ्या बाजूला ठाण्याचे अविनाश जाधव आणि मुंबईतील नितीन नांदगावकर यांबाबतीत देखील वेगळी परिस्थिती नसून येथे देखील सामान्य मराठी माणसाची मदतीसाठी रीघ लागलेल्या असतात. त्यामुळे राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेलं कृष्णकुंज ते मनसेचे अविनाश जाधव, नितीन नांदगावकर आणि तुलसी जोशी हे आक्रमक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज मराठी माणसासाठी न्याय हक्काचं ठिकाण का बनलं आहे याचा विचार शिवसेनेने करायला हवा.

इथे लग्न जमते - मराठी विवाह

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(348)#Shivsena(483)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या