14 November 2019 1:03 PM
अँप डाउनलोड

राजा एकटा पडला आहे असं कोण म्हणेल हे चित्र पाहून? पहा VIDEO

मुंबई : आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५० वा वाढदिवस असल्याने, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. परंतु सत्तेत नसताना सुद्धा सुभेच्छा देण्यासाठी आलेल्या प्रचंड मराठी माणसाची आणि कार्यकर्त्यांची तोबा गर्दी पाहून ‘राजा एकटा पडला’ आहे असं केवळ राजकारण न समजणाराच बोलू शकतो.

राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्या देण्यासाठी आलेल्या लोकांची गर्दी एवढी प्रचंड आहे की पक्षाला वेगळा मंडप उभारावा लागला आहे. कोणत्याही राजकीय नेत्याचं वजन तेंव्हाच खरं समोर येत जेंव्हा तो सत्तेत नसतो. कारण सत्ता हेच कार्यकर्त्यांना बांधून ठेवण्याचं मोठं साधन म्हणून ओळखलं जातं. सत्ता आल्यावर सर्वच सत्ताधारी नेत्याच्या आजूबाजूला घुटमळत असतात, पण वास्तव समोर येत ते सत्ता गेल्यावर असंच एकूण राजकारणात म्हटलं जात.

कोणताही राजकीय पक्ष वाढतो तो कार्यकर्त्यांमुळेच हे वास्तव आहे. आज नेते त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी जरी इतर पक्षात जात असले तरी कार्यकर्त्यांची मात्र मोठी रीघ आणि ओढा आजही मनसेकडे असल्याने भविष्य आजही आशादायी असल्याचं हा विडिओ म्हणजे एक उदाहरण आहे.

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या