14 December 2024 3:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा
x

भाजपच्या १०५ पैकी काही आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात - यशोमती ठाकूर

Congress, Minister Yashomati Thakur, BJP MLA, MahaVikas Aghadi

मुंबई, १७ जुलै: राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय वादळ सर्वत्र चर्च आहे. त्यात महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्र सरकार स्थिर असल्याचं त्यांनी म्हटलं असून उलटपक्षी भाजपचे १०५ पैकी काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचं मोठं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं.

भाजपाचे आमदार आमच्या संपर्कात असून त्यांची नावं कळली तर राज्यात भूकंप येईल असा गौप्यस्फोट महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्ष आणि महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सरकार स्थिर असल्याचा विश्वासही व्यक्त केला आहे. आमचे कोणी फुटणार नाहीत असंही त्यांनी म्हटलं आहे. यशोमती ठाकूर यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

सध्या कार्यकर्त्यांकडून सातत्याने विचारलं जात आहे की महाराष्ट्रात काय होईल? मात्र मला सर्वांना सांगायचं आहे की राज्यातलं सरकार स्थिर आहे. कुणी हे स्थिर सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे, असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं. “जर कोणी सरकार अस्थिर करण्याचा किंवा पक्ष सोडण्याचा प्रयत्न केला तर त्याला चांगलं बडवू. आम्ही गांधीवादी आहोत पण दादागिरी किती दिवस सहन करायची. नाठाळांच्या माथ्यावर काठी कशी हाणायची याची शिकवण आम्हाला मिळालेली आहे. तुमची गाठ आमच्ययाशी आहे लक्षात ठेवा,” असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.

यापूर्वीही महाआघाडीचे सरकारच्या नेत्यांनी राजस्थान राजकीय परिस्थिती बिघडली असली तरी महाराष्ट्रातील सरकार हे स्थिर असल्याचं वक्तव्य केलं होतं. कल भाजप नेते नारायण राणे यांनी सामना वृत्तपत्रातून पूर्वी शरद पवारांविरोधात आलेल्या बातम्यांचा उल्लेख केला होता. तर त्यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. संजय राऊत हे नोकरी जरी सामनात करीत असले तरी ते काम शरद पवारांचं करतात असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

 

News English Summary: BJP MLAs are in touch with us and if their names are known, there will be an earthquake in the state, said Maharashtra Pradesh Congress Committee Executive President and Women and Child Welfare Minister Yashomati Thakur.

News English Title: Congress Yashomati Thakur Bjp MLA Maharashtra Government News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x