5 August 2021 3:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
पेगासस हेरगिरी | जर रिपोर्ट्स खरे असतील तर हा एक गंभीर मुद्दा - सर्वोच्च न्यायालय Special Recipe | सोपी कृती आणि कमी साहित्यात बनवा चटकदार भडंग - पहा रेसिपी उच्चांकी महागाईत अमृता फडणवीस यांचा पुणेकरांना अजब सल्ला | कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा युवासेनेत मोठे फेरबदल होणार | प्रथमच ठाकरे आडनावाबाहेरील व्यक्ती थेट युवासेना प्रमुख बनणार? - सविस्तर वृत्त Special Recipe | रुचकर पनीर पराठा रेसिपी नक्की ट्राय करा उत्तर प्रदेश निवडणुक २०२२ | प्रियांका गांधी यांच्यासंबंधित 'तो' जुना सल्ला काँग्रेस आता गांभीर्याने घेणार? भारतीय हॉकी टीमने घडवला इतिहास | ऑलिम्पिकमध्ये 41 वर्षांनंतर भारतीय हॉकीला मिळाले मेडल
x

जलयुक्त शिवार योजना | 1 हजार कामांतील भ्रष्टाचार रडारवर | ई-टेंडर शिवाय अनेक भाजप कार्यकर्त्यांना ठेकेदारी

Devendra Fadnavis

मुंबई, 22 जुलै | फडणवीस सरकारच्या काळातील महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेत अनियमितता झालेल्या १००० कामांची भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) चौकशी होणार आहे. विजयकुमार समितीने आपल्या अहवालात ही शिफारस केली असून उर्वरित १२८ कामांची विभागीय चौकशी करावी, असेही समितीने राज्य सरकारला सुचवले आहे. अनेक कामे ई-टेंडर न काढता करण्यात आली. काम न करता देयके अदा केली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

तांत्रिक मुद्द्यांना बगल देत कामे रेटण्यात आली. अनेक कामांची उपयोगिता शून्य ठरली, असा ठपका विजयकुमार समितीने आपल्या अहवालात ठेवला आहे. फडणवीस सरकारच्या काळात जलयुक्त शिवार योजना प्रथम ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीत हाेती. त्याच्या मंत्री पंकजा मुंडे होत्या. नंतर मृद व जलसंधारण विभाग स्वतंत्र करून त्याकडे योजना वर्ग केली. त्याचे मंत्री राम शिंदे होते.

फडणवीस सरकारला मुंबई हायकोर्टात खेचले होते:
योजनेचा लाभ भाजप कार्यकर्त्यांना ठेकेदारी देण्यासाठी होत असल्याचा आरोप त्या वेळी विरोधकांनी केला होता. दरम्यान, जलयुक्त शिवार योजनेत पाणलोटाचे नियम डावलल्याने पर्यावरणाची हानी होत असल्याचा आरोप या क्षेत्रातील तज्ज्ञांनी केला होता. त्याबाबत फडणवीस सरकारला मुंबई उच्च न्यायालयात खेचले होते.

९ हजार ६३३ कोटींचा खर्च, ‘कॅग’च्या अहवालातही ठपका
१. महाराष्ट्र टंचाईमुक्त करण्यासाठी ५ डिसेंबर २०१४ रोजी सदर योजना सुरू केली. २०१९ पर्यंत सहा लाखांपेक्षा अधिक कामे झाली. त्यावर ९ हजार ६३३ कोटी रुपये खर्च करण्यात आले.
२. भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) यांनी त्यांच्या अहवालात या याेजनेच्या कामांवर ठपका ठेवला होता. त्यानंतर महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाने १४ ऑक्टोबर रोजी चौकशीचा निर्णय घेतला होता.
३. योजनेबाबत सरकारकडे ६०० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. कॅगने ६ जिल्ह्यांतील १२० गावांतील ११२८ कामांची तपासणी केली.
४. कोणत्या कामांची तपासणी करायची याची निश्चिती करण्यासाठी मृद व जलसंधारण विभागाने १ डिसेंबर २०२० रोजी सेवानिवृत्त सनदी अधिकारी विजयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली ३ सदस्यीय समिती नेमली.
५. या समितीला ६ महिन्यांची मुदत देण्यात आली होती. तसेच समितीचा अहवाल प्राप्त होताच संबंधित यंत्रणांनी त्या कामांच्या चौकशीला तत्काळ प्रारंभ करावा, असे शासन निर्णयात म्हटले आहे.

मराठवाड्यातील वास्तव:
मराठवाड्यात जलयुक्त शिवार योजनेची जिल्हानिहाय चौकशी होणार आहे. एकूण 2 हजार 417 कोटी रुपयांच्या कामांची चौकशी करण्यात येणार आहे. मराठवाड्यात 6 हजार 20 गावांमध्ये जलयुक्तची कामे झाली होती. यावेळी अनेक गुत्तेदार आणि मजूर संस्थांनी घोटाळे केल्याचा संशय असल्याने ही चौकशी करण्यात येणार आहे. एकूण 2 हजार 417 कोटी रुपयांच्या कामांची चौकशी करण्यात येणार आहे. मराठवाड्यात 6 हजार 20 गावांमध्ये जलयुक्तची कामे झाली होती. यावेळी अनेक गुत्तेदार आणि मजूर संस्थांनी घोटाळे केल्याचा संशय असल्याने ही चौकशी करण्यात येणार आहे.

मराठवाड्यातील जलयुक्त शिवार कामाची जिल्हानिहाय चौकशी करण्यासाठी जलसंधारण आणि आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही चौकशी समिती जलयुक्तचे जिल्हानिहाय रेकॉर्ड तपासणार आहे. मराठवाड्यातील तब्बल पावणे दोन लाख कामे संशयाच्या भोवऱ्यात असल्याने ही चौकशी होत आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Jayyukta Shivar Yojana under ACB investigation news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(649)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x