5 August 2021 4:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Naukri | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये 511 जागांसाठी भरती | ऑनलाईन अर्ज करा माविआ कधीही पडेल, राज्यपाल अत्यंत निष्ठावंत व कर्तृत्ववान | त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसल्याने राग - अमृता फडणवीस पेगासस हेरगिरी | जर रिपोर्ट्स खरे असतील तर हा एक गंभीर मुद्दा - सर्वोच्च न्यायालय Special Recipe | सोपी कृती आणि कमी साहित्यात बनवा चटकदार भडंग - पहा रेसिपी उच्चांकी महागाईत अमृता फडणवीस यांचा पुणेकरांना अजब सल्ला | कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा युवासेनेत मोठे फेरबदल होणार | प्रथमच ठाकरे आडनावाबाहेरील व्यक्ती थेट युवासेना प्रमुख बनणार? - सविस्तर वृत्त Special Recipe | रुचकर पनीर पराठा रेसिपी नक्की ट्राय करा
x

काँग्रसला राज्यात नंबर एकचा पक्ष बनवायचा आहे | आम्ही सगळे मिळून काम करणार आहोत - नाना पटोले

Nana Patole

मुंबई, 22 जुलै | आघाडी सरकारमध्ये एकत्र असले तरीही काँग्रेस महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढवणार आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याविषयी घोषणा करत होते. आता त्यांच्या या घोषणांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही पाठबळ दिले आहे अशी माहिती पटोले यांनी बुधवारी दिली. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असूनही काँग्रेस स्थानिक निवडणुका एकट्यानेच लढवणार असल्याचे पटोलेंनी सांगितले आहे. मंगळवारी कर्नाटकचे काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांच्यासमवेत नाना पटोले यांनी राहुल गांधींची भेट घेऊन पक्षाच्या रणनीतीविषयी चर्चा केली होती.

BhagyaVivah Marathi Matrimonial

याविषयावर बोलत असताना नाना पटोले म्हणाले की, ‘महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. हा निर्णय राहुल गांधी यांच्या सोबत झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला. पक्षश्रेष्ठींचा हा निर्णय आहे तो सर्वांना पाळावा लागेल. यासोबतच कुठल्याही मंत्र्याच्या चुकीचा अहवाल काँग्रेस वरिष्ठांना गेलाला नाही असेही पटोले म्हणाले आहेत.

काँग्रस राज्यात नंबर एकचा पक्ष बनवायचा आहे:
पुढे बोलताना पटोले म्हणाले की, ‘महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षासाठी मी एक स्वप्न पाहिले आहे. काँग्रेस राज्यात एक नंबरचा पक्ष बनवायचा आहे. यासाठीच राहुल गांधी यांनी मास्टर प्लान दिलेला आहे. त्यावर आम्ही सगळे मिळून काम करणार आहोत. काँग्रेस पक्ष भक्कम करण्यासाठी आमची काहाही करायची तयारी असल्याचे पटोले म्हणाले. यासोबतच संघटनात्मक पातळीवर फेरबदल केले जाण्याचे संकेत त्यांनी दिले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Making congress party on top in Maharashtra is my dream said Nana Patole news updates.

हॅशटॅग्स

#NanaPatole(31)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x