19 April 2024 12:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर 13 रुपयांवर आला, आता IIFL ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस केली जाहीर Reliance Power share Price | अल्पावधीत 2400% परतावा देणारा रिलायन्स पॉवर शेअर होल्ड करावा की बाहेर पडावे? Samvardhana Motherson Share Price | 18 पैशाच्या शेअरची जादू! गुंतवणुकदार झाले करोडपती, पुढेही फायद्याचा स्टॉक Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला Infosys Share Price | भरवशाचे टॉप 7 शेअर्स स्वस्त झाले, पण व्हॉल्यूम लाखोमध्ये, संयम राखल्यास मिळेल मल्टिबॅगर परतावा IREDA Share Price | IREDA शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, सर्किट फिल्टरही वाढला, स्टॉक तुफान तेजीत येणार? Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत मोठी अपडेट, 1 वर्षात 412% परतावा देणारा 39 रुपयाचा शेअर तेजीत येणार?
x

उस्मानाबाद: शंभू महादेव साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुंभारंभ, स्थानिकांसाठी वरदान

उस्मानाबाद : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील आणि राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील यांच्या पुढाकाराने कळंब तालुक्यातील शंभू महादेव साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुंभारंभ करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील सर्व साखर कारखाने पूर्ण क्षमतेने चालवले तर ग्रामीण भागाचे अर्थकारण कधीच कोलमडणार नाही आणि परिणामी कुठल्याने शेतकऱ्यांचे पैसे बुडणार नाहीत आणि शेतकऱ्यांची फसवणूक सुद्धा होणार नाही, असं मत राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना व्यक्त केलं.

त्यासाठी आम्ही डीडीएन एसएफए युनिट दोन हा साखर कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून शेतकऱ्यांची अडचण दूर करणार असल्याचे प्रतिपादन राणा जगजितसिंह पाटील यांनी केले. तसेच पुढील वर्षापर्यंत तेरणा कारखान्याला गतवैभव आणून कारखाना सुरु करणार असल्याचे सुद्धा ते म्हणाले. तालुक्यातील हावरगाव येथील कै. चंद्रकलादेवी नगर येथील डीडीएन एसएफए युनिट दोन साखर कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आला. दरम्यान, या कार्यक्रमाला शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर हजेरी होती.

दरम्यान, डॉ. पद्मसिंह पाटील कुटुंबीय हे उस्मानाबादच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मराठवाडा राजकारणातील मोठं प्रस्त म्हणून परिचित आहे. तसेच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सुद्धा त्यांचा दबदबा कायम राहील असं एकूण चित्र आहे. दरम्यान, या कार्यक्रमाला आमदार राहुल मोठे, एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, मल्हार पाटील, मेघा पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा अर्चना पाटील, अमोल पाटोदेकर, सुरेश बिराजदार, सुरेश दशमुख, सभापती दत्तात्रय साळुंके, उपसभापती भाग्यवान ओव्हाळ, नगराध्यक्ष सुवर्ण मुंडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रामहरी शिंदे, गटनेते श्रीधर भवर आणि दिलीप नाडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x