नाशिक: भीषण आगीमुळ लॉकडाउनदरम्यान अनेक कुटुंब बेघर
नाशिक, २५ एप्रिल: नाशिकच्या भीमवाडी झोपटपट्टीला आज सकाळी अचानक भीषण आग लागली असून या आगीत २५ ते ३० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. आग लागल्यानंतर एकामागोमाग एक सात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. त्यामुळे एकच हाहाकार उडाला. आग आणि धुराचे लोळ पसरल्याने येथील रहिवाश्यांमध्ये एकच धावपळ उडाली. तब्बल दीड तासांपासून ही आग विझवण्याचे काम सुरू असून आग लवकर आटोक्यात येत नसल्याने येथील संतप्त रहिवाश्यांनी दोन अग्निशमन दलाच्या जवानांवर दगडफेक केल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, मात्र हाती आलेल्या ताज्या वृत्तानुसार यात झोपडपट्टीतील दोनशे घरे जळून खाक झाली आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र लॉकडाउनच्या संकटामुळे अडचणीत असलेल्या येथील लोकांवर आता बेघर होण्याची वेळ आली आहे.
या आगीत स्थानिकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. केवळ अंगावरच्या कपड्यानिशी घराबाहेर पडल्याने या लोकांचा जीव वाचला आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी येथील नागरिकांचे संसार मात्र नेस्तानाबूत झाले आहेत. आगीत ज्यांची घरे जळून खाक झाली आहेत. त्या सर्वांची तात्पुरती बी. डी. भालेकर शाळेत निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. माणसांबरोबर येथील जनावरांनाही या आगीचा मोठा फटका बसला आहे. या आगीत एक गाय जखमी झाली आहे. तर आग लागल्यानंतर १४ गायी, ३० म्हशी आणि ७० बकऱ्या गोठ्यातून पळाल्या.
पीटीआयच्या वृत्तानुसार, सकाळी साडेनऊच्या सुमारास भद्रकाली परिसरातील भीमवाडी येथील सहकार नगरमध्ये आग लागली. दाट लोकवस्ती असल्यामुळे परिसरात आग वेगाने पसरली. घरातील सिलेंडर्सच्या स्फोटाने आग अधिक वाढली. परिणामी जवळपास २०० घरे जळून खाक झाली. या आगीत जनावरे जखमी झाले असल्याचे समजते. दरम्यान आग आटोक्यात आणताना अग्नीशमन दलातील काही जवान किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी जवानांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
News English Summary: A huge fire broke out in Bhimwadi slum of Nashik this morning and 25 to 30 huts have been burnt to ashes. After the fire broke out, one of the seven gas cylinders exploded in a row and the fire spread like wildfire. So there was only one wail. The fire and smoke billowed, causing a single stampede among the residents.
News English Title: Over 200 shanties gutted in major fire that broke out at slum in Nashik Maharashtra during corona crisis lockdown.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News