मुंबई : भाजप-एनसीपीचे अनैतिक राजकीय संबंध खूप जुनेच असून राज्यातील सध्याच्या सरकारचा जन्मच मुळात अशा अनैतिक संबंधांतून झाला आहे. केवळ अहमदनगरमधील नव्या पॅटर्नमुळं फक्त मोठ्या प्रमाणावर उफाळून आले इतकेच,’ अशी उपहासात्मक टीका टीका ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

अहमदनगर महानगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास भारतीय जनता पक्षाने एनसीपीच्या मदतीने हिसकावून घेतल्याने शिवसेनेचा तीळपापड झाला आहे. दरम्यान, शिवसेना नेतृत्वाने आज सामनामधील अग्रलेखामधून भाजपावर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे.

एकीकडे हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होता कामा नये असे म्हणायचे आणि दुसरीकडे दुसर्‍या बाजूला एनसीपीशी अनैसर्गिक, अनैतिक संबंध ठेवून सत्ताभोग घ्यायचा. हेच भारतीय जनता पक्षाचे धोरण आहे. त्यांची खरी युती हिंदुत्ववादाशी नसून भ्रष्टवादाशी आहे हे राष्ट्रवादीशी संबंध ठेवून भाजपने सिद्ध केले आहे, असा टोला शिवसेना पक्षप्रमुखांनी लगावला आहे.

काय म्हटलं आहे नेमकं आजच्या सामनामध्ये?

Shivsena chief criticised bjp and ncp over nagar politics