15 May 2021 1:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस महाराष्ट्र सरकारची लस खरेदी निविदा मोदी सरकारने परवानगी न दिल्याने रखडली Alert | महाराष्ट्रात म्यूकरमायकोसिसमुळे ५२ जणांचा मृत्यू, सर्वच जण कोरोनातून बरे झाले हाेतेे ताैक्ते’ चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून कच्छच्या दिशेने | अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
x

मोदी सरकारने ऑगस्टा वेस्टलँडला काळ्या यादीतून बाहेर काढले व "मेक इन इंडियात" सामील केले

नवी दिल्ली : ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणावरुन काँग्रेसनं भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. काळ्या यादीत असणाऱ्या ऑगस्टा वेस्टलँड कंपनीला “मेक इन इंडियात” का सामील करुन घेतलं असा सवाल काँग्रेसच्या थेट पत्रकार परिषदेत उपस्थित केला आणि भाजप तोंडघशी पडल्याचे समजते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

शनिवारी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर व्यवहारातील दलाल ख्रिश्चन मिशेल याला पटीयाळाच्या न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. मिशेलनं चौकशीदरम्यान काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींचं नाव घेतलं असा आरोप सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) वकिलांनी न्यायालयात केला होता. त्यानंतर काल राष्ट्रीय काँग्रेसने जाहीर पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि नरेन्द्र मोदींना तोंडघशी पडल्याची चर्चा सध्या दिल्लीच्या राजकारणात रंगली आहे.

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल करत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करून भाजपला कोंडीत पकडले आहे. दरम्यान, ते पत्रकार परिषदेत म्हणाले की, “काळ्या यादीतील कंपनी ऑगस्टा वेस्टलँडमध्ये मोदीजीच खरे ‘दामदार’ आहेत. ईडीच्या साह्याने मोदी सरकार काँग्रेसचे नाव खराब करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे. तसेच मोदीजींच्या राज्यात ‘ईडी’ आता Embarrassing Disaster बनली आहे आणि ‘चौकीदार’च खरा ‘दागदार’ असे सुद्धा ते प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.

दरम्यान, ईडीने शनिवारी केलेल्या दाव्यानुसार, ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणामध्ये देशाचा चौकीदारच खरा दागदार आहे. ऑगस्टा वेस्टलँडला मोदी सरकारने काळ्या यादीतून बाहेर का काढले? ह्याचे उत्तर मोदी सरकारने द्यावे. आणि जर मोदी सरकारने हे स्पष्ट केले नाही तर याचे परिणाम त्यांना नक्कीच भोगावे लागतील. कारण २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव अटळ आहे. त्यानंतर आम्ही यावर चौकशी समिती नेमून संबंधित दोषींना शिक्षा देण्याचे काम करू, असे सुद्धा त्यांनी ठणकावले आहे.

हॅशटॅग्स

#Congress(490)#Narendra Modi(1540)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x