15 December 2024 3:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Tata Technologies IPO | पैसे तयार ठेवा! टाटा टेक्नॉलॉजी IPO लवकरच ओपन होणार, अशी संधी पुन्हा मिळणार नाही

Tata Technologies IPO

Tata Technologies IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप फायद्याची आहे. तब्बल 19 वर्षांनंतर टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकदार या आयपीओची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या कंपनीच्या IPO ला सेबीची मान्यता मिळाली आहे. अशा परिस्थितीत ऑगस्ट 2023 च्या अखेरीस किंवा सप्टेंबर महिन्यात टाटा टेक्नॉलॉजी कंपनी आपला IPO शेअर बाजारात लाँच करु शकते. (Tata Technologies Share Price)

टाटा टेक्नॉलॉजी IPO डिटेल :

शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या आयपीओचा आकार 12,000 कोटी रुपये असू शकतो. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने सादर केलेल्या DRHP प्रस्तावानुसार कंपनी आपल्या IPO अंतर्गत 4,05,668,530 शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. तज्ञांच्या मते या कंपनीच्या IPO स्टॉकची किंमत प्रति शेअर 295 रुपये असेल. जर कंपनीने 10 ते 15 रुपयांची सूट किंवा प्रीमियम जोडला तर शेअरची किंमत किमान 285 रुपये ते कमाल 310 रुपये दरम्यान असू शकते.

ग्रे मार्केट कामगिरी :

ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ज्ञांच्या मते टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे IPO शेअर्स 84 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील आठवड्यात ग्रे मार्केटमध्ये टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO स्टॉक 16 रुपये स्वस्त किमतीवर ट्रेड करत होता.

टाटा टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये भारतातील दिग्गज वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने मोठी गुंतवणूक केली होती. आता टाटा मोटर्स कंपनी आयपीओद्वारे टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स शेअर्स विकून भांडवल उभारणी करणार आहे. म्हणून टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स देखील तेजीत वाढत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Technologies IPO today on 07 August 2023.

हॅशटॅग्स

#Tata Technologies IPO(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x