2 July 2020 8:49 PM
अँप डाउनलोड

देशाचा २०१८-१९ चा अर्थसंकल्प म्हणजे 'आवळा देऊन कोहळा काढला'.

नवी दिल्ली : २०१८-१९ चा अर्थसंकल्प आणि सर्व सामन्यांच्या अपेक्षांचा मोदी सरकार कडून मोठी अपेक्षा भंग झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेला आजचा अर्थसंकल्प हा सर्व सामान्यांनसाठी ‘आवळा देऊन कोहळा काढला’ असाच काहीसा झाला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मागील कररचनेत कोणताही बदल झालेला नाही, पण आरोग्य आणि शिक्षण अधिभार १ टक्क्याने वाढवण्यात आला आहे. त्यामुळे सामान्यांच्या बिलात वाढ होणार असून त्यांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. थोडक्यात काय तर खरेदी करताना एवढंच लक्ष्यात ठेवा की तुमच्या प्रत्येक बिलावर १ टक्के अधिभार द्यावा लागणार आहे. कारण पूर्वीचा ३ टक्के असलेला अधिभार हा वाढवून ४ टक्के करण्यात आला आहे.

जमेची बाजू हीच की, येत्या खरिपाच्या हंगामापासून शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्यात येणार आहे. तसेच शेती आणि आरोग्य क्षेत्राला तुलनेने अधिक तरतूद करण्यात आली आहे. तर देशातील गरीब कुटुंबांना दरवर्षाला ५ लाख पर्यंतच्या उपचाराची तरतूद करण्यात आली आहे. २०१९ मध्ये लोकसभा निवडणूका असल्याने मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे.

कर रचनेत कोणताही बदल नाही.

0 ते अडीच लाख – शून्य

2.5 लाख ते पाच लाख – 10 टक्के (३००० अतिरिक्त सूट )

5 लाख ते दहा लाख – 20 टक्के

दहा लाखांपेक्षा जास्त – 30 टक्के”

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x