27 May 2022 12:03 AM
अँप डाउनलोड

सोनिया गांधी पुन्हा सक्रिय, विरोधकांची पुन्हा मोट बांधणी

नवी दिल्ली : भाजप विरोधात दंड थोपटण्यासाठी स्वतः सोनिया गांधी यांनी पुढाकार घेऊन विरोधकांची मोट बांधणी सुरु केली आहे. उद्या १ फेब्रुवारी रोजी स्वतः सोनिया गांधी यांनी सर्व विरोधी पक्षांची निवासस्थानी बैठक बोलावली आहे.

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या निवासस्थानी सर्व विरोधी पक्षांची भेट झाली होती आणि आता स्वतः सोनिया गांधी मैदानात उतरल्या असून त्यांच्याकडून सर्व समविचारी पक्षांना निमंत्रण सुद्धा पाठविण्यात आले आहेत. तर ९ फेब्रुवारी रोजी समविचारी विरोधी पक्षांच्या नेत्यांसाठी डिनरचे आयोजन ही करण्यात आले आहे.

नुकतंच संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले असून त्यात सर्व समविचारी विरोधी पक्षांची भूमिका महत्वाची ठरणार आहे आणि त्यासाठीच सोनिया गांधी यांनीं हा विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x