17 May 2024 10:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | पगारदारांनो! या खास योजना तुम्हाला अल्पावधीत 22 लाख रुपयेपर्यंत परतावा देतील, यादी सेव्ह करा Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग
x

मतदारांनो! आली रे आली निवडणुकीपूर्व 'मोदी' स्वस्ताई आली! सविस्तर

नवी दिल्ली : पाच राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला आणि विशेष करून मोदी ब्रॅण्डला पडलेल्या फटाक्यांमुळे भाजपाला लोकसभा निवडणुकीआधी खडबडून जाग आली आहे. महागाई घटत नसल्याने भाजपची मतं घटली आणि परिणामी धार्मिक राजकारण पथ्यावर न पडल्याने हिंदी भाषिक पट्यात काँग्रेस सत्तेत विराजमान झाली आहे. आता लोकसभा निवडणुकीचा धसका घेतलेल्या मोदी सरकारकडून निवडणुकीआधी मतदारांना आकर्षित करण्यासाठी करांमध्ये घट करून विविध वस्तू स्वस्त करण्याचे प्रकार सुरु झाले आहेत.

विशेष म्हणजे हे सर्व करण्यासाठी मागील साडेचार वर्ष मोदी सरकारला कोणी रोखले होते असा प्रश्न उपस्थित होतो आहे. कारण, आजपासून सिनेमा तिकीट, मानिटर स्क्रीन, पावर बँक आणि ३२ इंचाच्या टीव्ही संचासह २३ वस्तू स्वस्त करण्यात आल्या आहेत. २२ डिसेंबर रोजी नवी दिल्लीत जीएसटी परिषदने २३ वस्तूवरील कर कमी केला होता. आजपासून ही आमंलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे नववर्षात सर्वसामान्य व्यक्तींना गिफ्ट मिळाले असले तरी २-३ महिन्यांवर येऊ घातलेल्या लोकसभा निवडणूक त्यामागील मूळ कारण असल्याचे राजकीय विश्लेषकांना वाटतं.

इतकेच नाही तर डिजिटल कॅमेरा, मोबाइलच्या पॉवर बँक, व्हिडीओ कॅमेरा रेकॉर्डर्स, व्हिडीओ गेम कन्सोल्स, वाहनांचे ट्रान्समिशन शाफ्ट्स आणि क्रँक्स, गिअर बॉक्स, पुनप्र्रक्रिया केलेले टायर आदी वस्तूंवर आता २८ टक्क्यांऐवजी १८ टक्के जीएसटी करण्यात आला आहे. १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या सिनेमा तिकिटांवरील जीएसटी २८ वरून १८ टक्के, तर १०० रुपयांपेक्षा कमी मूल्याच्या तिकिटांवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व वस्तू आता स्वस्त झाल्या आहेत.

तसेच हवाबंद डब्यात गोठवून ठेवलेल्या ब्रॅण्डेड भाज्या आणि संरक्षित केलेल्या भाज्यांवरील ५ टक्के जीएसटी रद्द, तर अपंगांच्या व्हिलचेअरसह सर्व वस्तू आणि त्यांचे सुटे भाग यांच्यावर जीएसटी २८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर संगमरवर दगडावरील १८ टक्के जीएसटी ५ टक्क्यांवर, चालण्यासाठीची आधारकाठी, लाकडी बूच, राखेपासून बनवलेल्या विटांवरील जीएसटी १२ वरून ५ टक्क्यांवर, संगीतावरील पुस्तकांचा कर १२ वरून शून्यावर आला आहे.

मागील साडेचार वर्ष यासर्व बाबींचं विचार सुद्धा न करणारं मोदी सरकार लोकसभा निवडणुकीआधी एवढं दिलदार होण्यामागील मूळ कारण हे पाच राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपाला बसलेला फटका आणि आगामी लोकसभा निवडणूक असंच म्हणावं लागेल.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x