17 May 2024 5:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज लोकसभेच्या रिंगणात

नवी दिल्ली : मोदी सरकारवर खुलेपणानं टीका करणारे आणि समाजातील प्रत्येक गंभीर प्रश्नावर बेधडकपणे भाष्य करणारे अभिनेते प्रकाश राज आता राजकारणाच्या आखाड्यात उतरणार आहेत. त्यांनी नववर्षाच्या सुरूवातीला आपण २०१९ ची लोकसभा निवडणुक लढवणार असल्याचं अधिकृत ट्विट केलं आहे. विशेष म्हणजे त्यासाठी त्यांनी कोणत्याही पक्षाची निवड केली नसून ते थेट अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

मागील अनेक वर्षांपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर सडकून टीका करत आहेत. इतकंच नव्हे तर मी भाजपवर टीका करतो म्हणून मला कोणी चित्रपटात काम सुद्धा देत नाही, असा आरोप त्यांनी केला होता. कलाकारांची आणि विचारवंताची समाजात होणाऱ्या गळचेपीवरही आणि केंद्र सरकारच्या हुकूमशाहीवर त्यांनी कडाडून टिका केली होती.

‘ते म्हणतात की मी हिंदूच्या विरोधात आहे, पण मी हिंदूच्या विरोधात नसून मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधात आहे. एवढंच नाही तर माझ्यामते मोदी आणि अमित शाह हे स्वतः हिंदू नाहीत’ अशी बोचरी टीका त्यांनी जानेवारी २०१८ मध्ये ट्विटद्वारे केली होती. त्यांच्या या ट्विटमुळे अनेकांनी त्यांना सोशल मीडियावर लक्ष्य केलं. परंतु, आजही ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x