27 May 2022 5:51 AM
अँप डाउनलोड

सर्वच निर्दोष म्हणजे त्या सर्व हत्या नसून, ते स्वत:च मेले आहेत: राहुल गांधी

मुंबई : गुजरातच्या सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणातील २२ आरोपी निर्दोष असल्याचा निर्णय सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिला आहे. यावर राष्ट्रीय कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमाने ट्विट केले आहे. हरेन पांड्या, जस्टिस लोया, तुलसीराम प्रजापती, प्रकाश ठोंबरे, श्रीकांत खंडाळकर, कौसर बी, सोहराबुद्दीन शेख या सर्वांची हत्या नसून ते स्वत:च मेले आहेत, असे राहुल गांधी यांनी ट्विट करत टोला लगावला आहे.

२००५ साली गुजरात पोलिसांनी सोहराबुद्दीन शेखला चकमकीत ठार केले. परंतु, ही चकमक नसून सोहराबुद्दीनचे अपहरण करून हत्या केल्याचा आरोप होता. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा देखील याप्रकरणातील आरोपींंमध्ये समावेश होता. परंतु, २०१४ साली त्यांना आरोपमुक्त करण्यात आलं होते. या बनावट चकमकीचा कट रचला होता हे सिद्ध करता आलं नाही. त्यामुळे सर्व संबंधित आरोपींची पुराव्या अभावी मुक्तता करण्यात आली आहे आणि सोहराबुदद्दीनचा मृत्यू गोळी लागूनच झाला, असे कोर्टाने सांगितले आहे.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(238)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x