14 December 2024 5:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Inflation CNG PNG Price Hike | महागाई अजून वाढणार | PNG आणि CNG'च्या दरांतही वाढ

Inflation CNG PNG Price

मुंबई, ०५ ऑक्टोबर | नैसर्गिक वायूच्या (नॅचरल गॅस) किमतीत केंद्र सरकारने 62 टक्के वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर महानगर गॅस लिमिटेडनेही पीएनजी आणि सीएनजीच्या दरांत अनुक्रमे प्रतिएकक व प्रति किलो दोन रुपयांनी वाढ केली आहे. ही दरवाढ 4 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. मुंबईत सध्या सीएनजीचा दर प्रतिकिलो 51.98 रुपये इतका आहे. यामध्ये लवकरच वाढ होण्याची (Inflation CNG PNG Price Hike) शक्यता आहे. तर पीएनजीचा दर प्रति घनमीटर 49.40 रुपये इतका आहे.

Inflation CNG PNG Price Hike. Mahanagar Gas Ltd has also hiked PNG and CNG prices by Rs 2 per kg and Rs 2 per kg respectively, on the back of a 62 per cent hike in natural gas prices by the central government :

केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या किमतीत केलेल्या वाढीमुळे वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सीएनजी आणि प्रमुख शहरांमध्ये घरगुती वापरासाठी पुरवठा केल्या जाणाऱ्या पाईप गॅसच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्याचाच भाग म्हणून महानगरकडूनह पीएनजी आणि सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली. मुंबईतील अनेक वाहने सीएनजीवर चालतात. त्यामुळे वाहतुकीच्या भाडेदरात वाढ होऊ शकते. तसेच पीएनजी गॅसच्या दरवाढीमुळे सामान्यांचे किचन बजेट कोलमडू शकते.

मागील काही दिवसांपूर्वी दिल्लीसह उत्तर भारतात सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली होती. दिल्लीत शनिवारपासून सीएनजीच्या दरात 2.28 रुपये, तर नोएडा, गाझियाबाद आणि ग्रेटर नोएडात सीएनजीचा दर किलोमागे 2.55 रुपयांनी वाढला. तर घरगुती वापरासाठीच्या पीएनजी गॅसच्या दरातही 2.10 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली होती.

यापूर्वी जुलै महिन्यात मुंबईत महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात किलोमागे 2.58 रुपयांची तर पीएनजीच्या किमतीत 55 पैशांची वाढ केली होती. गॅस पाइपलाइन वाहतुकीच्या खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे परिचालन खर्च आणि अतिरिक्त खर्च देखील वाढला आहे. यामुळेच गॅसच्या दरांमध्ये वाढ केल्याचे महानगर गॅसच्या वतीने सांगण्यात आले होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Inflation CNG PNG Price Hike todays updates.

हॅशटॅग्स

#Inflation(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x