12 December 2024 2:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Pandora Papers Exposed | त्या 4 बड्या भारतीय व्यक्तींच्या परदेशी संपत्तीची चौकशी होणार

Pandora Papers Exposed

नवी दिल्ली, ०५ ऑक्टोबर | करदात्या देशांत छुपी मालमत्ता घेण्याच्या पडताळणीशी संबंधित दस्तऐवजांमध्ये ३०० भारतीयांची नावे आहेत. यात व्यापारी, ४ नेते आणि इतरांचा समावेश आहे. तथापि, सध्या काही (Pandora Papers Exposed) नावेच समोर आली आहेत. ही अशी गुंतवणूक आहे, जिची माहिती सरकारी संस्थांना दिली गेली नाही. दरम्यान, केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) म्हटले की, विविध संस्था याप्रकरणी चौकशी करतील. यात ईडी, आरबीआय, आयकर विभाग आणि एफआययू यांचा समावेश आहे. सरकार यासंबंधीची माहिती विदेशातून मिळवण्यासाठी पावले उचलेल.

Pandora Papers Exposed 4 Indian institutions to investigate foreign assets. There are names of 300 Indians in the documents related to the verification of possession of hidden assets in the taxpayer countries :

शोध पत्रकारांची संस्था इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट्सचा (आयसीआयजे) पँडोरा पेपर्स नावाच्या अहवालात पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदीची बहीण पूर्वी मोदी, जॅकी श्राॅफ, किरण मजुमदार शाॅ यांच्या पतीचेही नाव आहे. भारतासह ९१ देशांतील ३५ आजी व माजी राष्ट्राध्यक्षांची व ३३० हून अधिक नेते व अधिकाऱ्यांची नावे आहेत.

पेपर्समध्ये या भारतीयांवर आराेप {इक्बाल मिर्ची, नीरा राडिया, जॅकी श्राॅफ, अनिल अंबानी, सचिन तेंडुलकर, विनोद अदानी, किरण मजुमदार शॉ, समीर थापर, पूर्वी मोदी, अजित केरकर, कॅप्टन सतीश शर्मा.

गुंतवणूक कायदेशीररीत्या वैध :
तेंडुलकर सचिन तेंडुलकरच्या वकिलाने म्हटले की, माजी क्रिकेटपटूची गुंतवणूक कायदेशीररीत्या वैध आहे. त्याबाबत कर अधिकाऱ्यांना माहिती आहे.

शाॅ यांनी पतीचा ट्रस्ट वैध असल्याचे सांगितले :
बायाेकाॅनच्या एक्झिक्युटिव्ह चेअरपर्सन किरण मजुमदार शाॅ म्हणाल्या की, त्यांच्या पतींचा विदेशातील ट्रस्ट पूर्णपणे वैध आहे. तो पूर्णपणे स्वतंत्र ट्रस्टी चालवतात.

टोनी ब्लेअर, पुतीन आणि शकिराचेही नाव:
अहवालानुसार जॉर्डनच्या शहांनी ब्रिटन आणि अमेरिकेत छुप्या रीतीने सात कोटी पौंडची संपत्ती खरेदी केली. ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर आणि त्यांच्या पत्नीने लंडनमध्ये कार्यालय खरेदी करताना मुद्रांक शुल्क भरले नाही आणि ३.१२ लाख पौंड वाचवले. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या मोनॅकोतील संपत्तीशी लिंक असल्याचेही समोर आले आहे. प्रसिद्ध पॉप सिंगर शकिराचेही यात नाव आहे.

इम्रान खानचेे मंत्रीही, राजीनाम्याची मागणी :
यादीत पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खानच्या काही मंत्र्यांची नावे आहेत. अर्थमंत्री शौकत तारिन, जलसंधारणमंत्री मुनीस इलाही, खासदार फैसल वावडा, उद्योग आणि उत्पादन मंत्री खुसरो बख्तियारच्या कुटुंबातील लोकांचा समावेश आहे. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे नातलग इश्हाक डार यांचेही नाव समोर आले. मंत्र्यांच्या नावे बेहिशेबी संपत्तीचे प्रकरण उघड झाल्याने विरोधी नेत्यांनी इम्रान खान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Pandora Papers Exposed 4 Indian institutions to investigate foreign assets.

हॅशटॅग्स

#PandoraPapers(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x