28 September 2020 9:43 PM
अँप डाउनलोड

खान डौलत डुलत आला, सैय्यद बंडा त्याच्या संगतीला: राष्ट्रवादीकडून व्हिडिओ प्रसिद्ध

Udhav Thackeray, Shivsena, Amit Shah, BJP, NCP

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर एनसीपीने एक व्हिडिओ प्रसिद्ध करून जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘अफझल खानाच्या फौजेत फितूर वाघ’ अशी जहरी टीका एनसीपीने केली आहे. त्याचवेळी पाच वर्ष अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणारे, आज थेट त्यांच्याच छावणीत. हेच का शिवरायांचे मावळे?? यांनी शिवरायांच्या नावाने मते मागणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचा अपमान आहे, असे ट्विट राष्ट्रवादीने केले आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही अफझल खानाच्या फौजेत जाऊन सेनेच्या सेनापतीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गांधीनगर गाठले, असे ट्विट करत उद्धव ठाकरेंवर टीका केलीआहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

पाच वर्ष एकमेकांना ‘पटकणारे’, कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणारे, आज अफझल खानाच्या सेनेच्या सेनापतीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी थेट गांधीनगर गाठतात! असले फितूर वाघ असूच शकत नाहीत. शिवसैनिक तर मुळीच नाही. शिवरायांच्या नावानं मतं मागणं म्हणजे महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचा अपमान आहे, असे अजित पवार यांनी ट्विट करताना म्हटले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून गांधीनगरमध्ये उमेदवारी अर्ज भरला. अमित शाहा यांचा उमेदवारी अर्ज भरताना एनडीए घटकपक्षांचे नेतेही उपस्थित होते. उद्धव ठाकरे अहमदाबादमध्ये दाखल झालेत आणि अमित शाहांच्या रॅलीत सहभागी झाले होते. यावरुन राष्ट्रवादीने शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यावेळी अजित पवार यांनीही बोचरी टीका केली.

पहा संपूर्ण व्हिडीओ

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Amit Shah(240)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x