28 January 2023 7:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax Return Filling | इन्कम टॅक्स भरल्यानंतर करा हे काम, अन्यथा नंतर अडचणी येऊ शकतात Hindenburg Report Vs Adani Group | देशाची अर्थव्यवस्था हादरनार? अदानी ग्रुप अडचणीत सापडणार? MSCI इन ऍक्शन ICICI Mutual Fund | मल्टिबॅगर स्टॉक नव्हे तर मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, सर्वाधिक परतावा देणाऱ्या योजनेची डिटेल्स पहा Horoscope Today | 29 जानेवारी 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Hindenburg Report Adani Group | अदानी ग्रुपबाबत हिंडेनबर्गचा अहवाल 'अत्यंत विश्वासार्ह'!, दिग्गज अब्जाधीश विल्यम एकमन Numerology Horoscope | 29 जानेवारी, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल? तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Bank Balance on WhatsApp | तुमच्या व्हॉट्सॲपवर समजेल तुमचा बँक बॅलन्स, जाणून घ्या प्रक्रिया
x

Lakhimpur Kheri Incident Video | आंदोलक शेतकऱ्यांना जीपने असे चिरडले | भाजपविरोधात देशभर संताप

Lakhimpur Kheri Incident Video

लखनऊ, ०५ ऑक्टोबर | उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा बळी गेल्यामुळे (Lakhimpur Kheri Incident Video) देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. शेतकऱ्यांसह विरोधकांच्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचे पुत्र आशिष यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून निवृत्त न्यायाधीशांमार्फत हिंसाचाराच्या चौकशीची घोषणा केली. मात्र, मृतांच्या कुटुंबियांना भेटण्यापासून रोखण्यात आल्याने विरोधकांनी भाजपा सरकारला लक्ष्य केले.

Lakhimpur Kheri Incident Video Viral appears that show farmers being run over by SUV. Eight people, including four farmers, were killed in the incident on Sunday :

त्यानंतर लखीमपूर खेरीमध्ये रविवारी घडलेल्या घटनेचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एक जीप मागून शेतकऱ्यांना उडवताना दिसत आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधी नेत्यांनी भाजपवर हल्ले तीव्र केले. फॅक्टचेक मध्ये देखील सत्य समोर आलं असून भाजपच्या नेत्यांचा आतंकी चेहरा समोर आल्याची टीका समाज माध्यमांवर आली आहे. त्यानंतर काँग्रेससह देशभरातील विरोधकांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की मोठ्या संख्येने शेतकरी हातात झेंडे घेऊन रस्त्यावर आंदोलन करत आहेत. दरम्यान, हूटर वाजवत असताना मागून येणाऱ्या जीपने अनेकांना चिरडले. जीपच्या मागे एक एसयूव्ही देखील आली. भरधाव जीपने धडक दिल्याने अनेक लोक जखमी झाले. एका वृद्धाला जीपला धडक दिल्यानंतर त्याने बोनेटवर उडी मारली आणि नंतर जमिनीवर पडले. अचानक घडलेल्या घटनेने घटनास्थळी भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर सर्वांनी जखमींना बाजूला करण्याचा प्रयत्न केला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Lakhimpur Kheri Incident Video Viral appears that show farmers being run over by SUV.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x