सुप्रीम कोर्टाने रियाची प्रोटेक्टिव्ह ऑर्डरची याचिका फेटाळली, बिहार पोलिसांचा मार्ग मोकळा

नवी दिल्ली, ६ ऑगस्ट : सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी दरदिवशी नवनवीन ट्विस्ट समोर येत आहेत. केंद्र सरकारने सीबीआय चौकशीला परवानगी दिल्यानंतर अचानक या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. ईडीने देखील रियाला चौकशीसाठी समन्स पाठवले असून तिचा सहकारी सॅम्युअलची ईडी चौकशी करत आहेत. सुप्रीम कोर्टाने रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी प्रोटेक्टिव्ह ऑर्डरची याचिका दाखल केली होती. मात्र, कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे बिहार पोलिसांचे पथक रियाची चौकशी करू शकते.
सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीसह ५ जणांविरोधात पाटणातील राजीव नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यांनी आपल्या तक्रारीत आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यासोबत अनेक गंभीर आरोप केले. रियाने पैशांसाठी सुशांतला फसवल्याचंही त्यांनी यात म्हटलं आहे. त्यामुळे सुशांत प्रकरण मनी लॉण्डरिंगशी संबंधित असल्यामुळे ईडीने गुन्हा दाखल केला आहे.ईडीने रियाला तिच्या मुंबईतील घरी आणि ईमेलमार्फत समन्स पाठवला आहे. ईडीची मुंबई येथील ब्रँचमध्ये रियाची तीन भागांमध्ये चौकशी होणार आहे. काल रियाचा सहकारी सॅम्युअल मिरांडाची ईडीने चौकशी केली आणि आज देखील चौकशी सुरु आहे.
दरम्यान, सुशांत सिंह मृत्यू प्रकऱणी आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना अद्यापही होम क्वारंटाइन करण्यात आलं असल्याने बिहार पोलीस कायदेशीर मार्गाने मुंबई पोलिसांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. बिहारचे पोलीस महासंचालक (डीजीपी) गुप्तेश्वर पांडे यांनी एएनआयशी बोलताना ही माहिती दिली आहे. सुशांत सिंहचे वडील के के सिंह यांनी पाटणा येथे पोलीस तक्रार दाखल केल्याने विनय तिवारी तपासासाठी बिहारमधून मुंबईत दाखल झाले होते. पण मुंबईत पोहोतचात त्यांनी क्वारंटाइन करण्यात आलं.
“आयपीएस विनय तिवारी यांना अद्यापही क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांना घरकैदेत ठेवल्यासारखी परिस्थिती आहे. महाधिवक्तांशी चर्चा केल्यानंतर आम्ही काय कारवाई करायची याचा निर्णय घेऊ. न्यायालयात जाणे हादेखील एक पर्याय आहे,” असं डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटलं आहे.
News English Summary: The ED has also summoned Rhea Chakraborty for questioning and her colleague Samuel’s ED is investigating. Rhea Chakraborty’s lawyers had filed a protective order in the Supreme court. However, the court dismissed the petition. Therefore, a team of Bihar police can interrogate Rhea Chakraborty.
News English Title: Rhea Chakraborty slapped by Supreme Court plea of protective order rejected News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Agnipath Protests | जवानांचा अपमान सुरु | भाजपच्या कार्यालयांना वॉचमन हवा असल्यास अग्निविरांना प्राधान्य देऊ
-
Multibagger Stocks | 1 लाखाच्या गुंतवणुकीचे 77 लाख करणारा हा शेअर खरेदी करा | 75 टक्के परतावा मिळेल
-
Advance Tax | तुम्ही ऍडव्हान्स टॅक्सच्या पहिला हप्ता भरला का? | ही तारीख चुकल्यास महागात पडेल
-
Swathi Sathish Surgery | या अभिनेत्रीला प्लास्टिक सर्जरी भोवली | फेमच्या नादात सुंदर चेहरा कुरूप झाला
-
Road Rage Video | कपल स्कुटीसकट खाली पडलं | त्यानंतर महिलेचं नाटक पहा | पुरुष नेटिझन्स का संतापले?
-
Eknath Shinde | गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांघवी करत आहेत शिंदें सोबत सेटलमेंट | पण पळालेले आमदार घाबरल्याची माहिती
-
TDS New Rules | भेटवस्तूंवर सुद्धा 10 टक्के टीडीएस | 1 जुलैपासून लागू होणारे हे नवे नियम लक्षात ठेवा
-
Business Idea | गुंतवणूक न करता हा व्यवसाय सुरु करा | महिन्याला 50,000 रुपयांची कमाई
-
Mangal Rashi Parivartan | 27 जूनला मंगळ मेष राशीत प्रवेश करेल | १२ राशींवर काय परिणाम होईल जाणून घ्या
-
Gold ETF Investment | हा गोल्ड फंड 64 टक्के परतावा देत संपत्ती वेगाने वाढवतोय | तुम्ही गुंतवणूक केली आहे का?