28 June 2022 11:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
एकनाथ शिंदेंनी बंडखोर आमदारांना या 'गेम प्लॅन' पासून ठेवलंय अंधारात | शिंदे आणि भाजपचा गेम प्लॅन बाहेर येतोय Multibagger Penny Stocks | हा 3 रुपयांचा पेनी शेअर करतोय मालामाल | आजही खरेदीला खूप स्वस्त Inflation Effect | पीठानंतर आता तांदूळ अजून महागणार आहे | तुमच्या किचनचा खर्च वाढणार Multibagger Stocks | तुम्ही सुद्धा असे शेअर निवडा | या शेअरने फक्त 10 महिन्यात 960 टक्के परतावा दिला Demat Deactivated | तुमचे डीमॅट खाते डिऍक्टिव्हेट होईल | फक्त 3 दिवस उरले | हे काम लवकर करा PPF Investment | मुलाच्या नावेही उघडता येईल पीपीएफ खाते | फायद्याच्या योजनेबद्दल जाणून घ्या New Labour Codes | तुम्ही 1 वर्ष नोकरी केल्यानंतरही मिळणार ग्रॅच्युइटीचे पैसे | पैशाचं गणित जाणून घ्या
x

सुशांतला इस्पितळात घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका चालकाला धमकीचे फोन..मोठा खुलासा

Ambulance driver, Sushant Singh Rajput, Hate calls

मुंबई, ६ ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्याप्रकरणी त्याचा मृतदेह नेणाऱ्या रुग्णवाहिता चालकाबाबतच्याही अनेक चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. त्यातच आता एक अतिशय महत्त्वाचा खुलासा त्या चालकाने केल्याचं उघडकीस येत आहे. सुशांतचा मृतदेह नेणाऱ्या या चालकाला गेल्या काही दिवसांपासून धमकी आणि द्वेषपूर्ण असे फोन येत आहेत.

हिंदुस्तान टाईम्सनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, आतापर्यंत विशाल बंदगर आणि त्यांचा भाऊ विविध रुग्णालयांसाठी रुग्णवाहिकेची सेवा पुरवतात. पण, सुशांतच्या प्रकरणापासून त्यांना धमकीचे फोन येऊ लागले. अर्वाच्च भाषेत फोनवरुन अनेक व्यक्ती त्यांना धमकावत असून, ज्यावेळी सुशांतला रुग्णवाहिकेत ठेवण्यात आलं, तेव्हा त्याचे प्राण गेले नव्हते असं फोन करणारे वारंवार म्हणत असल्याचा आणि असा धक्कादायक दावा करत असल्याची माहिती या रुग्णवाहिका चालकांनी दिली.

सुशांतला आम्हीच मारल्याचा आरोप ही फोन करणारी मंडळी करत असून, परमेश्वर आपल्याला याची शिक्षा देईल असं फोन करणाऱ्यांकडून धमकावण्यात येत असल्याचा खळबळजनक खुलासा या रुग्णवाहिका चालकांनी केला. येत्या काळात धमक्यांचं हे सत्र थांबलं ऩाही, तर मात्र या रुग्णवाहिका चालकांनी पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी दरदिवशी नवनवीन ट्विस्ट समोर येत आहेत. केंद्र सरकारने सीबीआय चौकशीला परवानगी दिल्यानंतर अचानक या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. ईडीने देखील रियाला चौकशीसाठी समन्स पाठवले असून तिचा सहकारी सॅम्युअलची ईडी चौकशी करत आहेत. सुप्रीम कोर्टाने रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी प्रोटेक्टिव्ह ऑर्डरची याचिका दाखल केली होती. मात्र, कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे बिहार पोलिसांचे पथक रियाची चौकशी करू शकते.

सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीसह ५ जणांविरोधात पाटणातील राजीव नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यांनी आपल्या तक्रारीत आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यासोबत अनेक गंभीर आरोप केले. रियाने पैशांसाठी सुशांतला फसवल्याचंही त्यांनी यात म्हटलं आहे. त्यामुळे सुशांत प्रकरण मनी लॉण्डरिंगशी संबंधित असल्यामुळे ईडीने गुन्हा दाखल केला आहे.ईडीने रियाला तिच्या मुंबईतील घरी आणि ईमेलमार्फत समन्स पाठवला आहे. ईडीची मुंबई येथील ब्रँचमध्ये रियाची तीन भागांमध्ये चौकशी होणार आहे. काल रियाचा सहकारी सॅम्युअल मिरांडाची ईडीने चौकशी केली आणि आज देखील चौकशी सुरु आहे.

 

News English Summary: In the case of actor Sushant Singh Rajput’s suicide, there was a lot of discussion about the ambulance driver carrying his body. It is now revealed that the driver made a very important revelation.

News English Title: Ambulance driver who ferried Bollywood actor Sushant Singh Rajputs death body is getting hundreds of hate calls News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x