27 May 2022 5:22 AM
अँप डाउनलोड

दिलीप लांडेंना दणका, चांदिवलीतील माजी सेना शाखाप्रमुखासह अनेक शिवसैनिक मनसेत

मुंबई : लोकसभा निवडणूका जसजशा जवळ येत आहेत तसं तसे विविध पक्षातील नाराज कार्यकर्ते फुटण्यास सुरुवात झाली आहे. मनसेतून कोलांटी उडी घेत आणि स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी मनसेच्या इतर नगरसेवकांना भुरळ घालून शिवसेनेत मलईदार पद पदरात पाडून घेणाऱ्या नगरसेवक दिलीप लांडेंना मनसेने दणका दिला आहे.

ज्या मतदारसंघातून नगरसेवक दिलीप लांडे विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत, त्याच मतदारसंघातील माजी शिवसेना शाखाप्रमुख सागर तुलसकर यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी आज मनसेत जाहीर प्रवेश केला. दरम्यान, याच मतदारसंघातील शिवसेनेतील जुन्या शिवसैनिकांमध्ये दिलीप लांडे यांच्याबद्दल प्रचंड चीड असल्याने, शिवसेनेला अजून फटके बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे येथील शिवसेनेचे काही नगरसेवक सुद्धा दिलीप लांडे यांच्यावर पक्षाने जास्तच मेहेरबानी केल्याने नाराज असल्याचे वृत्त आहे.

मनसेचे चांदिवली येथील विभागाध्यक्ष सुरेश नाना भिंताडे यांच्या मार्गदर्शखाली मनसेचा जोरदार पक्षविस्तार सुरु असून, भिंताडे कुटुंबीय देखील कधीकाळी कट्टर शिवसैनिकांच कुटुंब होतं.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(714)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x