16 August 2022 9:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 17 ऑगस्ट, बुधवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल, काय सांगतं अंकज्योतिष शास्त्र Balaji Solutions IPO | बालाजी सोल्यूशन्स आयपीओ लाँच करणार, गुंतवणुकीपूर्वी कंपनीचा तपशील जाणून घ्या Multibagger Stocks | लॉटरीच लागली! या शेअरच्या गुंतवणूकदारांना 9000 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा आणि मल्टिबॅगर डिव्हीडंड सुद्धा Investment Schemes | सर्वात जास्त परतावा आणि टॅक्स बचत करणाऱ्या सरकारी योजना कोणत्या?, नफ्याच्या योजनांची माहिती जाणून घ्या PPF Account Money | तुम्हाला पीपीएफ खात्यातील गुंतवणुकीचे पैसे मुदतीपूर्वी काढता येतात, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या Horoscope Today | 17 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या वंदे मातरम् चळवळ उत्तम | आता जनतेने, पत्रकारांनी आणि विरोधकांनी वंदे मातरम् बोलतच भाजपला महागाई, बेरोजगारीवर प्रश्न विचारानं गरजेचं
x

फडणवीसच ईडी कारवायांच्या याद्या दिल्लीत देतात | विरोधकांना त्रास देण्यासाठी तेच ईडी ऑपरेट करतात

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis | दरम्यान, राज्यात सुरु असलेल्या राजकीय कारस्थानाचे सूत्रधार हे देवेंद्र फडणवीसच आहेत, असा थेट आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. फडणवीस दर दोन दिवसांआड दिल्लीत येतात, अमित शाहा आणि जे पी नड्डा यांची भेट घेतात. इथे पुढची रणनीती आखतात. ईडीचं कायरायचं, ईडीच्या याद्या देतात. कुणावर काय कारवाी करायची, कुणावर कसा दबाव टाकायचा, हे ठरवतात. मग साधनसामुग्रीची व्यवस्था करतात. दर दोन दिवसांनी ते हे करतात, त्यामुळे तेच याचे सूत्रधार आहेत, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश :
फडणवीस प्रयत्न करीत असले तरीही सरकारला काहीही होणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. सुप्रीम कोर्टाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे. ११ तारखेला तेव्हा सुनावणी घेऊ तेव्हा आहे तशीच परिस्थिती ठेवा, असे कोर्टाने सांगितले असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. मात्र त्याही स्थितीत जर कुणी मुख्यमंत्र्यांना विश्वासदर्शक ठराव मांडायला सांगितला, तरी शिवसेनेत विधिवत फूट पडलेली नाही, अशा स्थितीत शिवसेनेचा व्हीप त्यांना लागू असेल, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

त्याविरोधात कोर्टात जाऊ :
राष्ट्रपती राजवट लावण्याबाबतही त्यांनी आपली भूमिका मांडली. सुप्रीम कोर्टाने जर जैसे थे परिस्थिती सांगितली असेल, तर असा निर्णय घेता येणार नाही. पण जरी तो निर्णय केंद्राने घेतला तर आम्ही त्याविरोधात कोर्टात जाऊ असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Devendra Fadnavis is the mastermind of this conspiracy is directly accused by Prithviraj Chavan check details 28 June 2022.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(701)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x