‘स्मार्ट सिटी’ केवळ निवडणुकीचं गाजर, अनेक ठिकाणी सुरुवातच नाही

नवी दिल्ली : स्मार्ट सिटी परियोजनेंतर्गत निवडण्यात आलेल्या नागपूर, औरंगाबाद, पुणेसह महाराष्ट्रातील आठ शहरांसाठी केंद्र सरकारने आतापर्यंत १,५६८ कोटी रुपये दिले आहेत; मात्र वस्तुस्थिती ही आहे की, ४ वर्षांनंतर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवडत्या योजनेंतर्गत निर्धारित कार्यांतील ५८ टक्के कामांना अद्याप सुरुवातच करण्यात आल्याचे निष्पन्न झालं आहे.
योजनेंतर्गत महाराष्ट्रातील पिंपरी-चिंचवड, नाशिक, ठाणे, सोलापूर, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद, पुणे आणि नागपूरची निवड झाली होती. या सगळ्या शहरांत एकूण १३,२८८ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून वेगवेगळी विकास कामे पूर्ण केली जाणार होती; मात्र शहर विकास मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार त्यातील ५,९०६ कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे काम एक तर सुरू केले गेले आहे किंवा पूर्ण झाले आहे. हे एकूण कामांच्या जवळपास ४२ टक्के आहे, तर ५८ टक्के कामे अजून सुरू व्हायच्या प्रतीक्षेत आहेत. पुणे शहरात सगळ्यात जास्त ३,९७५.८२ कोटी रुपयांची कामे केली जाणार होती. त्यात १,५९४.७ कोटी रुपयांचीच कामे सुरू केली गेली आहेत. वेगाने कामे करण्यात नागपूर सगळ्यात पुढे आहे. नागपूरमध्ये एकूण १८९४.३४ कोटी रुपये गुंतवणुकीतून होणाऱ्या कामांतून १,६५६.९४ कोटी रुपयांची कामे सुरू आहेत किंवा पूर्ण झाली आहेत. मंत्रालयातील दस्तावेजानुसार महाराष्ट्रातील आठ शहरांपैकी प्रत्येकाला १९६ कोटी रुपये केंद्र सरकारकडून स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत दिले गेले आहेत. शहर विकास राज्यमंत्री हरदीप पुरी यांनी नुकतेच संसदेत हे मान्य केले की, स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शंभर शहरांसाठी २५ जानेवारीपर्यंत १,०५,००० कोटींच्या २,७४८ कामांसाठी निविदा काढण्यात आल्या. त्यातील ६२,२९५ कोटीच्या २,०३२ प्रकल्पांचे काम सुरू झाले आहे.
महाराष्ट्रातील एकूण आठ शहरांची स्थिती (रुपये कोटींमध्ये)
शहर केंद्राचा निधी अंदाजे खर्च चालू/पूर्ण योजनांचा खर्च
- पिंपरी चिंचवड १९६ ११४०.८५ ३१५.९१
- नाशिक १९६ १५८७.५७ ८९३.०९
- ठाणे १९६ १५१०.८३ ६३४.३३
- सोलापूर १९६ १८८१.२९ ३४६.०३
- क. डोंबिवली १९६ ९४०.४८ २२८.४८
- औरंगाबाद १९६ ३५७.०२ २३७.०२
- पुणे १९६ ३९७५.८२ १५९४.७
- नागपूर १९६ १८९४.३४ १६५६.९४
एकूण १५६८ १३२८८.२ ५९०६.५
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Multibagger Stocks | यादी सेव्ह करा! हे शेअर्स अल्पावधीत पैसा गुणाकारात वाढवत आहेत, स्टॉक तपशील वाचा
-
Budhaditya Rajyog | क्या बात! तुमची राशी 'या' 3 नशीबवान राशींमध्ये आहे का? बुधादित्य राजयोगाने सुख-समृद्धीचा मार्ग खुला होणार
-
Wheat Prices Hike | हिंदू-मुस्लिम-पाकिस्तान बातम्यांमध्ये आनंद घेणाऱ्या मतदारांसाठी आनंदाची बातमी, गहू आणि पीठ महाग होणार
-
Kody Technolab IPO | यापूर्वी संधी हुकली? आता कोडी टेक्नोलॅब IPO लाँच झाला, पहिल्याच दिवशी देईल मजबूत परतावा
-
Multibagger Stock | मार्ग श्रीमंतीचा! 2 महिन्यात पैसे दुप्पट, आता अहसोलर टेक्नॉलॉजीज कंपनीला ऑर्डर मिळाली, पुन्हा मल्टिबॅगर?
-
Multibagger Stocks | मल्टिबॅगर शेअर! अल्पावधीत 115 टक्के परतावा देणाऱ्या शक्ती पंप्स शेअरने 1 दिवसात 12 टक्के परतावा दिला
-
Kahan Packaging IPO | मार्ग श्रीमंतीचा! 80 रुपयाच्या IPO शेअरने फक्त एकदिवसात 100 टक्के परतावा दिला, आर्थिक स्ट्रार तेजीत
-
Numerology Horoscope | 17 सप्टेंबर 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
-
Waree Renewable Share Price | मार्ग श्रीमंतीचा! वारी रिन्यूएबल शेअरने 3 वर्षात 1 लाखावर दिला 80 लाख रुपये परतावा, पुढेही मल्टिबॅगर
-
EMS Limited IPO | सुवर्ण संधी! ईएमएस लिमिटेड कंपनीचा IPO पहिल्याच दिवशी 60 टक्के परतावा देऊ शकतो, करणार खरेदी?