11 December 2024 5:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

पुलवामात पुन्हा चकमक, मेजरसहीत ४ जवान शहीद

Pulwama attack, maulana masood ajhar, indian army, crpf, encounter

श्रीनगर : चार दिवसांपूर्वी पुलवामामध्ये दहशदवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. परंतु अजून देखील सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती संपण्याचे नावच घेत नाही. दक्षिण-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा भारतीय लष्कराला लक्ष्य केले आहे.

पुलवाम्यातील पिंगलान परिसरात आज पहाटेपासूनच दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये जोरदार चकमक सुरू झाली आहे. दहशतवाद्यांविरोधात लढताना एका मेजरसह ४ जवानांना वीरमरण आले, तर १ जण गंभीर जखमी आहे. अद्याप देखील परिसरात चकमक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. येथील एका घरात २ ते ३ दहशतवादी लपून बसले आहेत. दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी पहाटे सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली असता लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात ५ जवानांना वीरमरण आले आणि एक जवान जखमी झाला आहे. शहीद झालेल्या ४ जवानांमध्ये मेजर दर्जाच्या अधिकाऱ्याचा देखील समावेश आहे. सुरक्षा दलांनी २ ते ३ दहशतवाद्यांना घेरले असून अद्याप देखील चकमक सुरू असल्याचे वृत्त आहे. दरम्यान या चकमकीत १ स्थानिक नागरिक देखील जखमी झाल्याचे वृत्त आहे.

हॅशटॅग्स

#Indian Army(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x