17 May 2021 5:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
WHO'च्या शास्त्रज्ञाचा इशारा | भारतासाठी कोरोनाचं संकट मोठं, पुढील 6 ते 18 महिने चिंतेचे High Alert | मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा VIDEO | सुवेंदु अधिकारी यांनी माझ्याकडून लाच घेतली होती त्यांचं काय? मॅथ्यू सॅम्युअलचा सवाल देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट' केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर संपूर्ण पोलीस दल कोरोना आपत्तीत लोकांसाठी कर्तव्यावर | तर राज्याचे पोलीस महासंचालक सुट्टीवर प. बंगाल | सीबीआय'च्या TMC नेत्यांवर धाडी, ममता बॅनर्जी थेट CBI कार्यालयात
x

राहुल गांधींनी अध्यक्षपद घेण्यास होकार देताच रॉबर्ट वढेरांच्या घरी आयकर विभागाची धाड

Shivsena, BJP, Income Tax, Robert Vadera

मुंबई, ७ जानेवारी: राहुल गांधींचे भय हे दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना वाटते. लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला भय वाटते व हा एकटा योद्धा प्रामाणिक असेल तर भय शंभर पटीने वाढत जाते. राहुल गांधींचे भय त्या शंभर पटीतले आहे अशा शब्दात सामना अग्रलेखातून शिवसेनेने खासदार राहुल गांधी यांचे कौतुक केले आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

राहुल गांधी पुन्हा येत आहेत. अध्यक्षपद स्वीकारण्यास राहुल गांधी यांनी होकार दिला आहे ही बातमी पक्की होताच दुसऱ्य़ा बाजूला प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांच्या घरी आयकर विभागाचे पथक पोहोचले विभागाचे पथक पोहोचले, म्हणजे वढेरा यांच्या घरावर आयकर विभागाने ‘रेड’ टाकली. हा योगायोग नक्कीच नाही. रॉबर्ट हे सोनिया गांधी यांचे जावई आहेत हे सोडा, वढेरा यांच्याबाबत अनेक विवाद आणि प्रमादही आहेत, पण तरीही केंद्रीय तपास यंत्रणांचा अतिरेकी गैरवापर करून गांधी परिवाराचा छळ करण्याची ही पद्धत योग्य नाही असा आरोपही शिवसेनेने भारतीय जनता पक्षावर केला आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची आयकर विभागाने चौकशी केली आहे. या पार्श्वभूमीवर सामनाने ही टीका केली आहे.

तसेच, परदेशातून काळे धन आणायची गर्जना पंतप्रधान मोदी यांनीच केली. या काळय़ा धनवाल्यांनी पीएम केअर्स फंडात गुप्त दान करून स्वतःला शुद्ध करून घेतले आहे. याची चौकशी कोणत्या न्यायालयात होणार आहे? असा रोखठोक सवाल शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला केला आहे.

 

News English Summary: Rahul Gandhi is coming again. As soon as the news broke that Rahul Gandhi had agreed to accept the presidency, on the other hand, the Income Tax Department team reached the house of Priyanka Gandhi’s husband Robert Vadera.

News English Title: Shivsena slams BJP over Income Tax raid on Robert Vadera home news updates.

हॅशटॅग्स

#Saamana(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x