26 April 2024 12:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

ट्रम्प समर्थकांचा राजधानीत राडा | वॉशिंग्टन डीसीमध्ये कर्फ्यू लागू

D C Mayor, Orders Curfew, Donald Trump supporters, U S Capitol

वॉशिंग्टन, ७ जानेवारी: अमेरिकेत झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचं राजकारण संपायला तयार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा निवडणुकीत फेरफार झाल्याचा आरोप लावला आहे. सोबतच आता ट्रम्प त्यांच्या समर्थकांसोबत मिळून दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी व्हाईट हाऊस आणि कॅपिटल बिल्डिंगसमोर मोठ्यासंख्येने जमा होत राडा घातला. त्यानंतर वॉशिंग्टन डीसीमध्ये कर्फ्यू लावण्यात आला.

जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत गृहयुद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेत घुसून हिंसाचार केला आहे. अमेरिकन लोकशाहीचे प्रतिक समजले जाणाऱ्या कॅपिटल हिल इमारतीमध्ये ट्रम्प समर्थकांनी हिंसाचार केला. जो बायडन यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडीची घोषणा होणार होती. त्याच वेळेस ट्रम्प समर्थकांनी हिंसाचार करण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. या हिंसाचारात एक महिला ठार झाल्याचे प्राथमिक वृत्त हाती आले आहे.

नवे राष्ट्रपती म्हणून निवडून आलेले जो बायडेन यांनी ट्रम्प यांना संविधानाची सुरक्षा करण्याचे आवाहन केले आहे. “मी राष्ट्रपती ट्रम्प यांना आवाहन करतो की त्यांनी आपली शपथ पूर्ण करण्यासाठी तात्काळ राष्ट्रीय प्रसारमाध्यमावर जावं आणि संविधानाची सुरक्षा करावी आणि हे सर्व थांबवावं”, असं बायडेन म्हणाले.

या घटनेवर निवडून आलेले अध्यक्ष जो बायडन यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. हा विरोध नसून देशद्रोह आहे अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलंय. “कॅपिटॉल बिल्डिंगबाहेर जो गोंधळ झाला आम्ही तसे नाहीत. कायदा न मानणाऱ्यांची ही छोटी संख्या आहे…हा देशद्रोहाचा मार्ग आहे आणि तो थांबला पाहिजे”, असं बायडेन म्हणालेत.

 

News English Summary: The politics of the US presidential election are not ready to end. Donald Trump has once again accused the election of rigging. At the same time, Trump is now trying to put pressure on his supporters. Meanwhile, supporters of Donald Trump rallied in front of the White House and Capitol buildings. A curfew was then imposed in Washington DC.

News English Title: D C Mayor Orders Curfew as Donald Trump supporters storm U S Capitol news updates.

हॅशटॅग्स

#America(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x