23 September 2019 11:18 AM
अँप डाउनलोड

२०२४ मध्ये केंद्राकडून राम मंदिर उभारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल

Ram Mandir, Ayodhya, Narendra Modi

अयोध्या : केंद्रात नरेंद्र मोदी सरकार पुन्हा एकदा बहुमताने सत्तेत आल्याने अयोध्येतील प्रलंबित राम मंदिराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून त्यावर रामजन्मभूमी न्यासाचे सदस्य रामविलास वेदांती यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. रामविलास वेदांती यांनी केंद्र सरकारच्या चौथ्या टप्प्यात अयोध्येतील राम मंदिर उभारण्याची प्रक्रिया सुरु होईल असा धक्कादायक दावाकेंद्रात नरेंद्र मोदी सरकार पुन्हा एकदा बहुमताने सत्तेत आल्याने अयोध्येतील प्रलंबित राम मंदिराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून त्यावर रामजन्मभूमी न्यासाचे सदस्य रामविलास वेदांती यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. रामविलास वेदांती यांनी केंद्र सरकारच्या चौथ्या टप्प्यात अयोध्येतील राम मंदिर उभारण्याची प्रक्रिया सुरु होईल असा धक्कादायक दावा केला आहे. केला आहे.

रामविलास वेदांती यांनी सांगितलं आहे की, ‘केंद्र सरकार २०२० मध्ये राज्यसभेत बहुमत मिळाल्यानंतर सर्वप्रथम काश्मीमधून कलम ३७० रद्द करेल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कलम ३५अ संपवेल आणि तिसऱ्या टप्प्यात राम जन्मभूमी न्यासाकडे परत वर्ग करेल’.

रामविलास वेदांती यांच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकारने आधीच सुप्रीम कोर्टात जमीन परत करण्यासंबंधी याचिका दाखल करण्याची तयारी केली आहे. वेदांती यांनी दावा केला आहे की, ‘जमीन मिळाल्यानंतर चौथ्या टप्प्यात २०२४ मध्ये केंद्र सरकार राम मंदिर उभारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल’.

इथे लग्न जमते - मराठी विवाह

हॅशटॅग्स

#Narendra Modi(981)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या