2 July 2020 8:24 PM
अँप डाउनलोड

ब्रेकिंग न्यूज: हवाई दलाचे AN-३२ विमान बेपत्ता

Indian Air Force

नवी दिल्ली : भारतीय वायू दलाचे आसामहून अरुणाचल प्रदेशाच्या दिशेने जाणारे एएन – ३२ हे विमान १३ प्रवाशांसह बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. विमानात ८ क्रू मेम्बर्स आणि ५ प्रवाशांचा समावेश होता. आसामहून अरुणाचल प्रदेशाकडे जाण्यासाठी दुपारी या विमानाने उड्डाण केले. दुपारी १ वाजता या विमानाचा संपर्क तुटला.

BhagyaVivah Marathi Matrimonial

बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी हवाई वायू दलाचे सुखोई हे लढाऊ विमान आणि सी – १३० हे विशेष विमान तैनात केले आहे. हवाई दलाचे एएन – ३२ विमान बेपत्ता होण्याची ही अलीकडच्या काळातील दुसरी मोठी घटना आहे. यापूर्वी २०१६ साली २९ जणांसह एएन – ३२ बंगालच्या उपसागरात कोसळले होते.

याआधी देखील २०१६ मध्ये चेन्नईवरून पोर्ट ब्लेअरला जाणारे AN-३२ विमान बेपत्ता झाले होते. यामध्ये हवाई दलाचे १२ जवान, ६ कर्मचारी, १ नौदलाचा जवान, १ सैन्यदलाचा जवान आणि एका कुटुंबातील ८ सदस्य होते. १ पाणबुडी, ८ विमाने आणि १३ युद्धनौकांच्या मदतीने या विमानाचा शोध घेण्यात आला होता. यानंतरही या विमानाबद्दल माहिती मिळाली नव्हती.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#IndianAirForce(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x