11 August 2022 8:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Viral Video | बाईकवर बसलेल्या चिमुकल्याला गाडीने चिरडण्याचा भीषण प्रयत्न, बापाने जे केलं ते चमत्कारिक, पहा व्हिडिओ Mutual Funds | दररोज फक्त 333 रुपये गुंतवून कमवा 6 लाख रुपयांचा भरघोस परतावा, हा म्युच्युअल फंड करेल करोडपती Viral Video | सुसंस्कृत चोर बघितला का?, देवीला हात जोडून नमस्कार केला, नंतर दानपेटी घेऊन फरार, व्हायरल व्हिडिओ पहा Viral Video | पायऱ्यांवर एकदा पडला, लगेच कपडे बदलून आला आणि पुन्हा काय झालं त्याचा व्हायरल व्हिडिओ पहा Horoscope Today | 12 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI PPF Account | SBI मध्ये PPF खाते उघडताना या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, आर्थिक नुकसान टाळून फायद्यात राहा Lucky Numbers | या तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी 12 ऑगस्टचा दिवस वरदान, नोकरी-व्यवसायात प्रगतीचा योग
x

मोदी है तो मुमकिन है! सर्वसामान्यांचं जगणं डोईजड, तूरडाळ १०० रुपये किलो

Narendra Modi

मुंबई : लोकसभा निवडणूक जाहीर होताच प्रत्येक विषय हा ‘मोदी है तो मुमकिन है’ अशा अविर्भावात झाली. मात्र बहुमताने सत्तेत येऊन देखील सरकार महागाई रोखण्यात आणि सर्व सामान्यांना दिलासा देण्यात अपयशी होताना दिसत आहेत. कारण लोकसभा निवडणुका संपताच पुन्हा एकदा महागाईने डोकं वर काढलं आहे. या आठवड्यात तूरडाळीनं तब्बल शंभरी गाठलीय. तूरडाळ प्रति किलो १०० रुपये झाली आहे. विशेष म्हणजे गेल्यो २ महिन्यांमध्ये डाळीच्या दरात ३५ रुपयांनी वाढ झालीय. तूरडाळीबरोबर मूग, मटकी, मसुर यांच्या किमतीही वाढल्यात. त्याचबरोबर शेंगदाणा, वरी यांच्या किमतीही चढ्या होतायत.

महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाडा इथे अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे धान्याचं उत्पादन कमी झालं. तूरडाळीत प्रति किलो ८ रुपये वाढ झाल्यानं ती आता तब्बल १०० रुपयांवर पोहोचली आहे. कच्ची तूर ३९ रुपये ते ४० रुपये होती. त्यात १५ ते २० रुपयांनी वाढ झालीय. कच्ची तूरडाळ ५,५०० ते ५,९०० प्रति क्विंटल झाली आहे. त्यामुळे ग्राहकांपर्यंत पोचेपर्यंत ती तब्बल १०० रुपये किलो झाली.

मसुर डाळ, मूगडाळीच्या दरात प्रति किलो ४ रुपयांनी वाढ झालीय. तर मटकीच्या दरात प्रति किलो १० रुपयांनी वाढ झालीय. मागील दोन महिन्यात तूरडाळीचा दर वाढतच चाललाय. गेल्या आठवड्यात तो प्रति किलो ९२ रुपये होता. मोठे व्यापारी हे सतत बाजारपेठेचा अंदाज, ग्राहकांची मागणी, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि सरकारचं धोरण याकडे लक्ष ठेवून असतात. त्यातल्या बदलानुसार त्यांचे भाव ठरतात. त्यांनी भाव ठरवल्यानंतर त्याचा परिणाम देशपातळीवर होत असतो.

गेल्या नोव्हेंबरमध्ये तूरडाळ, मुगडाळ, चणाडाळ आणि मसुरडाळ १०० रुपये किलो झाली होती. उडीदडाळ १२० रुपयांवर पोचली होती. आता पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. या रोजच्या लागणाऱ्या गोष्टींमुळे महिला वर्गामध्ये मोदी सरकार विरोधात प्रचंड नाराजी पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जीवनाश्यक वस्तूंच्या भाव वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार नेमकी पावले उचलणार ते पाहावं लागणार आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1659)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x